इमॅन्युएल मॅक्राँ
(इम्मॅन्युएल मॅक्राँ या पानावरून पुनर्निर्देशित)
इमॅन्युएल मॅक्राँ ( २१ डिसेंबर, १९७७ , अमियॉं) हे फ्रान्स देशातील एक राजकारणी आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. ते माजी नागरी अधिकारी आणि गुंतवणूक बँकर आहेत. २०१७ च्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीत त्यांनी मरीन ले पेन यांचा पराभव केला.
इमॅन्युएल मॅक्राँ | |
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
| |
विद्यमान | |
पदग्रहण १४ मे २०१७ | |
मागील | फ्रान्स्वॉ ओलांद |
---|---|
अर्थव्यवस्था, उद्योग आणि डिजिटल कार्य मंत्री
| |
कार्यकाळ २६ ऑगस्ट २०१४ – ३० ऑगस्ट २०१६ | |
पंतप्रधान | मॅनुएल वाल्स |
मागील | आरनॉद मॉंतबूर्ग |
पुढील | मिशेल सापिन |
जन्म | २१ डिसेंबर, १९७७ अमियॉं, फ्रान्स |
राजकीय पक्ष | ऑन् मार्श! (२०१६-वर्तमान) |
मागील इतर राजकीय पक्ष | अपक्ष (२००९-२०१६) समाजवादी पक्ष (२००९ पूर्वी) |
आई | फ्रान्स्वा नोगेस-मॅक्रॉं |
वडील | जॉं-मिशेल मॅक्रॉं |
पत्नी | ब्रिजिट त्रोनिउ (२००७-वर्तमान) |
सही |
३९व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झालेले मॅक्रॉं फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष आहेत आणि नेपोलियन नंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण फ्रान्सचे प्रमुख आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत