इथियोपिया फुटबॉल संघ

इथियोपिया फुटबॉल संघ (फिफा संकेत: ETH) हा पूर्व आफ्रिकामधील इथियोपिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला इथियोपिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ८४व्या स्थानावर आहे. आजवर इथियोपिया एकाही फिफा विश्वचषक तसेच फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांसाठी पात्र ठरला नाही. इथियोपियाने १९६२ सालचा आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता.

बाह्य दुवेसंपादन करा