इटियाडोह धरण

अधिकृत नाव इटियाडोह
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
गाडवी
स्थान गाव: गोठणगाव, तालुका: अर्जुनी, जिल्हा: गोंदिया
सरासरी वार्षिक पाऊस १४२५ मिमी
उद्‍घाटन दिनांक १९६५-१९८१
जलाशयाची माहिती
क्षमता ३१८.५६ दशलक्ष घनमीटर
भौगोलिक माहिती
निर्देशांक 20°49′21″N 80°12′30″E / 20.8224931°N 80.2084351°E / 20.8224931; 80.2084351

धरणाची माहिती

संपादन

इटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एक मोठे धरण आहे.हे धरण गाढवी नदीवर बांधण्यात आलेले आहे.ते अर्जुनी या गावाजवळ आहे.यातील पाण्याचा वापर सिंचनासाठी होतो. या धरणातील पाण्याचा लाभ मुख्यत्वेकरून गोंदियागडचिरोली जिल्ह्यांना होतो. हा गोदावरी नदिच्या खोऱ्यात बांधण्यात आलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम सन १९६५ मध्ये सुरू करण्यात आले. या धरणासाठी मंजूर निधी ७.३४ करोड इतका होता. परंतु याचे काम पूर्ण करण्यास रु. ९.१८ करोड इतका निधी लागला.याची सिंचनक्षमता ४००८० हेक्टर इतकी आहे.

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : २९.८५ मी (सर्वोच्च)
लांबी  : ४२०.६१ मी

दरवाजे

संपादन

लांबी : ८५.३४४ मी.
सर्वोच्च विसर्ग : ३२२० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ०

पाणीसाठा

संपादन

क्षेत्रफळ  : ४६.९१ वर्ग कि.मी.
क्षमता  : २८८.८३ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : २२५.१२ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ७८०१.९३ हेक्टर
ओलिताखालील गावे  : १७

कालवा

संपादन

लांबी  : ७७.२५ कि.मी.
क्षमता  : ३९.६२ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ६०७५० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ३९५१६ हेक्टर

विद्युत निर्मीती

संपादन

जलप्रपाताची उंची  : २० मी.
सर्वोच्च विसर्ग  : ६ क्यूमेक्स / संयंत्र
क्षमता  : १६० मेगा वॅट
जनित्र  : २ X ८० मेगा वॅट

बाह्य दुवे

संपादन