इंदर राज आनंद
इंदर राज आनंद (मृत्यू ६ मार्च १९८७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संवाद आणि पटकथा लेखक होते. त्यांनी राज कपूरच्या अनेक चित्रपटांसाठी काम केले जसे आग (१९४८), आह (१९५३), अनारी (१९५९) आणि संगम (१९६३).[१] औपचारिकपणे हिंदी चित्रपटांसाठी लेखक म्हणून संबोधले जात असले तरी, ते खरेतर उर्दू लेखक होते, [२]व ते पटकथा आणि संवाद उर्दूमध्ये लिहित होते.[३]
Indian film dialogue and screenwriter | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | इंदर राज आनन्द | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च ६, इ.स. १९८७ | ||
व्यवसाय | |||
अपत्य | |||
| |||
ते अभिनेता-दिग्दर्शक टिन्नू आनंद आणि निर्माता बिट्टू आनंद यांचे वडील होते. इंदरचा नातू प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (सलाम नमस्ते (२००५) आणि अंजाना अंजानी (२०१०) आहे. [४] प्रसिद्ध दिग्दर्शक मुकुल आनंद हे इंदरचे पुतणे होते.
अमिताभ बच्चन अभिनीत शहंशाह हा लेखक म्हणून इंदरचा शेवटचा चित्रपट होता. इंदरच्या मृत्यूनंतर शहंशाह प्रकाशित झाला आणि तो त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक ठरला.
संदर्भ
संपादन- ^ Gulzar; Nihalani, Govind; Chatterjee, Saibal (2003). "Encyclopedia of Hindi Cinema". Encyclopædia Britannica (India). Popular Prakashan. p. 304. ISBN 8179910660.
- ^ Nandy, Ashis (1998). The Secret Politics of Our Desires: Innocence, Culpability and Indian Popular Cinema (इंग्रजी भाषेत). Palgrave Macmillan. p. 97. ISBN 9781856495165.
- ^ Aḵẖtar, Jāvīd; Kabir, Nasreen Munni (2002). Talking Films: Conversations on Hindi Cinema with Javed Akhtar (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. p. 49. ISBN 9780195664621.
- ^ "Salaam Namaste's director is 'very anxious'". Rediff.com Movies. 6 September 2005.