भारतीय व्यवस्थापन संस्था (अहमदाबाद)
भारतीय व्यवस्थापन संस्था (अहमदाबाद) (संक्षिप्त IIM-Ahmedabad ) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट- अहमदाबाद (आय.आय.एम अहमदाबाद किंवा आय.आय.एम.ए.) ही भारताच्या गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात असलेली व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना १९६१ मध्ये झाली. अहमदाबादमधील आय.आय.एम. हे कोलकात्यातील आय.आय.एम. नंतर स्थापन होणारे भारतातील दुसरे आय.आय.एम आहे.संस्थेची गणना मॅनेजमेन्टचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थांमध्ये होते.
IIM Ahmedabad | |
चित्र:भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद.png | |
ब्रीदवाक्य | विद्याविनियोगाद्विकास: |
---|---|
मराठीमध्ये अर्थ | ज्ञानाच्या वापरातून प्रगती |
Type | सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ |
स्थापना | 1961 |
विद्यार्थी | 1006 |
संकेतस्थळ | https://www.iima.ac.in/ |
ही संस्था पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेन्ट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेन्ट, फेलो प्रोग्रॅम इन मॅनेजमेन्ट आणि विविध कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एक्झ्युकिटिव्ह मॅनेजमेन्ट प्रोग्रॅम हे कोर्सेस घेते.
विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. रिझर्व्ह बँकेचे २०१३ पासूनचे गव्हर्नर रघुराम राजन, क्रिकेट समालोचक हर्ष भोगले, मॅनेजमेन्ट गुरू सी.के. प्रल्हाद, हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्राध्यापक श्रीकांत दातार, नॅसकॉमचे माजी प्रमुख किरण कर्णिक, आय.सी.आय.सी.आय बँकेचे संचालक के.व्ही. कामथ, ॲक्सिस बँकेच्या संचालिका शिखा शर्मा, श्रीराम ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष अरुण दुग्गल, क्रिसिलच्या माजी संचालिका रूपा कुडवा, फीडबॅक इन्फ्रास्ट्रक्चरचे संस्थापक विनायक चॅटर्जी, नोकरी डॉट कॉमचे संस्थापक संजीव भिखचंदानी, एज्युकॉम्पचे संस्थापक शंतनू प्रकाश यासारख्या विविध क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्ती या संस्थेच्या माजी विद्यार्थी होत्या. तसेच ख्यातनाम शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्यासारखे संचालक, आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आय.जी. पटेल आणि सी. रंगराजन, सी.ए. प्रल्हाद यांच्यासारखे प्राध्यापक या संस्थेला मिळाले.
इतिहास
संपादनपरिसर
संपादनवसतिगृहे
संपादनसंस्था आणि प्रशासन
संपादनप्रशासन
संपादनविभाग
संपादनशैक्षणिक
संपादनप्रवेश प्रक्रिया
संपादनसंस्थेची क्रमवारी
संपादनविद्यार्थी जीवन
संपादनहे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन