इंटरस्टेलर हा क्रिस्टोफर नोलन यांनी सह-लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित केलेला २०१४ चा भव्य विज्ञानपट आहे. यात मॅथ्यू मॅककोनाघी, अॅन हॅथवे, जेसिका चेस्टेन, बिल इर्विन, एलेन बर्स्टिन, मॅट डॅमन आणि मायकेल केन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका डिस्टोपियन भविष्यात पटकथा रचली आहे, जिथे मानवजात भयंकर अनिष्ट आणि उपासमारीत अडकली आहे. अशा वेळी अंतराळवीरांचा एक गट मानवजातीसाठी नवीन घराच्या शोधात शनि ग्रहाजवळील वर्महोलमधून प्रवास करतो.

बंधू ख्रिस्तोफर आणि जोनाथन नोलन यांनी पटकथा लिहिली, ज्याचा उगम जोनाथन २००७ मधील कथेत होता आणि मूळतः स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित करणार होता. एक कॅल्टेक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि २०१७ मधील भौतिकशास्त्र नोबेल विजेते असणारे किप थॉर्न यांनी कार्यकारी निर्माता आणि वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले. तसेच त्यांनी इंटरस्टेलरचे विज्ञान हे टाय-इन पुस्तक लिहिले. सिनेमॅटोग्राफर Hoyte van Hoytema यांनी पॅनव्हिजन अॅनामॉर्फिक फॉरमॅट आणि IMAX ७० मध्ये ३५ मिमी मूव्ही फिल्मवर चित्रीकरण केले.  मुख्य छायाचित्रण २०१३ च्या उत्तरार्धात अल्बर्टा, आइसलँड आणि लॉस एंजेलस येथे सुरू झाले. इंटरस्टेलर चित्रपटात व्यापक व्यावहारिक आणि सूक्ष्म प्रभाव वापरले आहेत. डबल निगेटिव्ह कंपनीने चित्रपटासाठि अतिरिक्त डिजिटल प्रभाव तयार केले.

इंटरस्टेलरचे प्रथम प्रदर्शन २६ ऑक्टोबर २०१४ रोजी लॉस एंजेलसमध्ये झाले. युनायटेड स्टेट्समध्ये डिजिटल प्रोजेक्टर वापरून स्थळांचा विस्तार करून प्रदर्शन करण्यात आले. चित्रपटाला समीक्षकांकडून सामान्यतः सकारात्मक पुनरावलोकने मिळाली. $६८१ दशलक्षांपेक्षा जास्त कमाई केली  (नंतरच्या री-रिलीजनंतर $७०३ दशलक्ष  कमाई केली). हा चित्रपट २०१४ चा दहावा-सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. त्याच्या वैज्ञानिक अचूकतेबद्दल आणि सैद्धांतिक खगोल भौतिकशास्त्राच्या चित्रणासाठी खगोलशास्त्रज्ञांनी त्याची प्रशंसा केली आहे. [] [] [] इंटरस्टेलरला ८७ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये पाच पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. यापैकी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी अकादमी पुरस्कार चित्रपटाने जिंकला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "10 of the Best Sci-Fi Movies Based on Actual Science". Collider. September 19, 2022. December 6, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 6, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Interstellar: How it Was One of the Most Scientifically Accurate Sci-Fi Movies Ever". August 31, 2022. December 6, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 6, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Thorne, Kip. "Applied Physics/Physics Colloquium: Kip Thorne – The Physics of the Cult Movie Interstellar". Stanford University. March 2, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 2, 2023 रोजी पाहिले. Christopher Nolan’s cult science fiction film Interstellar (2014) sprang from a treatment co-authored by physicist Kip Thorne, and so had real science — both firm and speculative — embedded in it from the outset.