आर्थर यंग
शेतीवरील इंग्रजी लेखक
आर्थर यंग हा अठराव्या शतकातील इंग्लंडमधील विचारवंत होता. त्याने शेती, अर्थशास्त्र, व समाजशास्त्रावर बरेच लिखाण केले. अठराव्या शतकात यंगने ग्रामीण फ्रांसमध्ये बराच प्रवास केला. या प्रवासातील त्याच्या रोजनिशीत फ्रांसमधील लोकसंख्यावाढीचे व त्यामुळे वाढलेल्या गरीबीचे वर्णन आहे. या रोजनिशीचा थॉमस माल्थसच्या विचारांवर प्रभाव झाला.