थॉमस रॉबर्ट माल्थस
थॉमस रॉबर्ट माल्थस (१७६६ - १८३४) हा इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्राचा ब्रिटिश अभ्यासक होता. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवताना नैसर्गिक स्रोत धोक्यात येऊन, अन्नधान्याचा तुटवडा भासेल आणि त्यातून दुष्काळ, दंगेधोपे, युद्धे अशी अराजकसदृश परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्याने लोकसंख्यावाढीचा सिद्धांत मांडताना दिला होता.[१]
सिद्धांत
संपादनइ.स. १७९८ मधे त्याने आपले लोकसंख्या वाढीबद्दलचे, अतिशय प्रसिद्ध असे विचार, प्रथम मांडले होते. माल्थसच्या मताप्रमाणे कोणत्याही देशाची लोकसंख्या, नेहमी भूमितीय गुणोत्तराने वाढत जाते तर या लोकसंख्येची भूक भागू शकेल अश्या अन्नपदार्थांची त्या देशातील निर्मिती फक्त अंकगणितीय गुणोत्तरानेच वाढू शकते. सोप्या शब्दात सांगायचे तर लोकसंख्या वाढीचा वेग हा अन्नपदार्थ उत्पादनाच्या वेगापेक्षा, नेहमीच जास्त असतो. माल्थस पुढे म्हणतो की असे जरी असले तरी निसर्गाने असे काही अडथळे (दुष्काळ, रोगराई, युद्धे,पूर) या लोकसंख्यावाढीच्या मार्गात निर्माण केले आहेत की जर माणसाने या बाबतीत काहीच केले नाही(शक्य असल्यास) तर जगातली लोकसंख्या आपोआपच मर्यादित राहील. जर मानवजातीने हे अडथळे दूर करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला तरच जगाची लोकसंख्यावाढ अनियंत्रितपणे मोठी होईल.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ शेखर देशमुख. "लोकसंख्यावाढीची चिंता : रास्त की अनाठायी?". २४ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.