इस्लामिक स्टेट्स

(आयसिस या पानावरून पुनर्निर्देशित)

इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अँड लेव्हंट (अरबी: الدولة الإسلامية في العراق والشام) (इसील), किंवा इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अँड सीरिया (संक्षेप: ISIS, आय.एस.आय.एस., आयसिस किंवा इसिस) ही एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना व स्वयंघोषित खिलाफत आहे. इस्लाम धर्मातील सुन्नी पंथाच्या वहाबी/सलाफी विचारांच्या कट्टर अतिरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही संघटना प्रामुख्याने पश्चिम आशियातील इराकसीरिया ह्या देशांमध्ये कार्यरत आहे.

काळा जिहादी ध्वज
मध्य पूर्वेतील सद्य भौगोलिक स्थिती.
  इराकच्या नियंत्रणाखालील भूभाग
  सीरियाच्या नियंत्रणाखालील भूभाग
  लेबेनॉनच्या नियंत्रणाखालील भूभाग
  आयसिसच्या नियंत्रणाखालील भूभाग
  इराकी कुर्दिस्तानच्या नियंत्रणाखालील भूभाग
  सीरियन कुर्दिस्तानच्या नियंत्रणाखालील भूभाग
  सीरियामधील बंडखोर गटांच्या नियंत्रणाखालील भूभाग
  अल-नुस्राच्या नियंत्रणाखालील भूभाग
  हिजबुल्लाच्या नियंत्रणाखालील भूभाग

सध्या इराक व सीरिया देशांतील मोठ्या भूभागावर आयसिसचे नियंत्रण आहे. आयसिसची स्थापना २००४ साली झाली व तिने अल कायदामध्ये प्रवेश केला. २०१४ साली आयसिस अल कायदामधून वेगळी झाली व अबू बक्र अल-बगदादी ह्या आयसिसच्या म्होरक्याने इस्लामिक खिलाफतीची घोषणा केली व स्वतःला खलिफा जाहीर केले. २०१४ साली आयसिसने इराकच्या वायव्य भागातील मोठा भूभाग काबीज केला व मोसुल हे इराकमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ताब्यात घेतले.

आयसिस हा एक अत्यंत हिंसक गट असून सुन्नी वगळता इतर मुस्लिम पंथांच्या लोकांचे शिरकाण, महिलांचे शोषण, अपहरण, बलात्कार, इत्यादी अनेक गुन्हे आयसिसद्वारे करण्यात येत आहेत. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून भारत, अमेरिका, रशिया, युरोपियन संघ इत्यादी प्रमुख देशांनी आयसिसला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून त्यांच्याद्वारे करण्यात येत असणारे हल्ले हा जगातील देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मध्य पूर्वेसोबतच युरोपउत्तर आफ्रिकेमध्ये देखील आयसिसचे अतिरेकी कार्यरत आहेत. बोको हराम, तालिबान इत्यादी इतर मुस्लिम अतिरेकी संघटनांनी आयसिसला पाठिंबा दर्शवला आहे.

२०१५ सालच्या नोव्हेंबरमध्ये आयसिसने पॅरिस महानगरामध्ये घडवून आणलेल्या हल्ल्यांमध्ये १२९ लोक मृत्युमुखी पडले.

इतिहास

संपादन

अल कायदा इन इराक, द मुजाहुदीन शूरा कौन्सिल आणि द इस्लामिक स्टेट ऑफ इराक आदी अनेक सुन्‍नी संघटनांमधून इसिसिचा जन्म झाला. या संघटनेच्या स्थापनेची घोषणा २०१३ सालच्या एप्रिलमध्ये झाली. सध्या जानेवारी २०१६मध्ये उत्तर इराक आणि पूर्व सीरियावर इसिसचे वर्चस्व आहे.

२०१३सालच्या फेब्रुवारीपर्यंत अल कायदाचे इसिसशी जवळचे संबंध होते. मात्र इसिस अतिशय कडवी संघटना असल्याने अल कायदाने तिच्याशी संबंध तोडले.

कट्टर सुन्‍नी असलेली इसिस ही संघटना शियांच्या निघृण हत्येसाठी ओळखली जाते. सरकारी आणि लष्करी संस्थांवर हल्ले करून या संस्थेच्या सदस्यांनी हजारो नागरिकाचे खून केले आहे्त.

इसिसची योजना

संपादन
  • सुन्‍नी इस्लामिक राजवटीची स्थापना.
  • सीरियातील सुन्‍नीबहुल भागांवर नियंत्रण
  • इराकपासून उत्तर आफ्रिकेपर्यंत इस्लामिक राज्याची स्थापना करणे.

इसिसचे बळ

संपादन
  • अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएच्या दाव्यानुसार इसिसकडे ३०,०००पेक्षा अधिक दहशतवादी सैनिक.
  • इसिसच्या म्हणण्यानुसार ४०,०००हून अधिक सैन्य. त्यांतील बहुसंख इराक, सीरियातले असून शिवाय फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, अमेरिका आदी देशांतील दहशतवाद्यांचा समावेश.
  • संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मते जगभरातल्या ८० देशांतील १५,००० दहशतवादी इसिसमध्ये सक्रिय.
  • आधुनिक तंत्रज्ञान व सोशल मीडियाच्या जोरावर इसिसमध्ये सैनिकांची भरती होते.

संस्थापक - अबू बकर अल बगदादी

संपादन
  • अबू बकर अल बगदादी ऊर्फ अबू दुआ हा इसिसचा संस्थापक असून, इब्राहिम अवाद इब्राहिम अली अल बादरी किंवा डॉ. इब्राहिम या नावानेही तो ओळखला जातो.
  • बगदादी ही इराकमधील सामरा शहरात १९७१मध्ये जन्मल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या इराकमधील हल्ल्याच्या वेळी तो मौलवी अहोता, असे सांगितले जाते.
  • तो बगदाद विद्यापीठाकडून इस्लामी स्टडीजमध्ये पीएच.डी झाला आहे.
  • अमेरिकेकडून ४ ऑक्टोबर २०११ रोजी बगदादीचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात आला. अमेरिकेने अबू बकर अल बगदादीच्या शिरावर एक कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. या बगदादीमुळेच अलकायदाचे सदस्य असलेलेअनेक तरुण इसिसकडे वळले.

इसिसचे आर्थिक बळ

संपादन
  • पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएस‍आयच्या हवाल्यानुसार सुमारे दोन अब्ज डॉलरची संपत्ती असलेली इसिस ही जगातली सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना आहे.
  • इसिस ही जिंकलेल्या प्रदेशांतील बँका, तेल आणि नैसर्गिग वायूचे स्रोत, कर, अपहरण, खंडणी, दळणवळणाचे आधुनिक नेटवर्क आदी मार्गांनी निधी जमवते.
  • इराकमधील मोसूल शहरातील मध्यवर्ती बँकेची ४३ कोटी डॉलर्सची लूट करून, शिवाय सराफी दुकानांवरही दरोडे टाकून इसिसने संपत्ती जमवली आहे.
  • सौदी अरेबियासह अन्य आखाती देशांमधून मानवता कार्याच्या सबबीखाली इसिसने निधी गोळा केला आहे.
  • पूर्व सीरियातल्या तेल प्रकल्पांतील तेल विकून निधीची उभारणी करून शिवाय सीरिया सरकारला वीज विकूनही इसिसने पैसा मिळवला आहे.

इसिसकडील शस्त्रसाठा

संपादन
  • अमेरिकी शस्त्रे हस्तगत करून त्यांचा वापर.
  • आर्मी कॉंबॅट युनिफॉर्म, रात्रीच्या धाडींसाठी ‘एनपीव्हीएस-७’ हा गॉगल.
  • पीएएसजीटी हेल्मेट, एम-१६ रायफली, एमा-४ कार्बाइन्स, एम-२०३ ग्रेनेड लॉंचर्स, एम-६०/एम-२४० मशीनगन्स, स्टिंगर क्षेपणास्त्र वगैरे..

इसिसच्या कारवायांमुळे झालेला जागतिक परिणाम=

संपादन
  • एकमेकांचे वैरी असलेली अमेरिका, इराण इसिसच्या विरोधात एकत्र.
  • इराकमध्ये पुन्हा लष्करी कारवाई करण्यास अमेरिका तयार नाही.
  • आतापर्यंतच्या दहशतवादी संघटनांमध्ये इसिस सर्वात कडवी असल्याने तिच्यावर कारवाई करताना अधिक प्राणहानीची शक्यता.
  • इसिसवर कारवाई केलयास इराक, तुर्कस्तान, सीरिया, लेबनॉन आणि जॉर्डन आदी देशांशी होणाऱ्या व्यापारावर वाईट परिणाम.
  • काळ्या बाजारात कच्च्या तेलाची स्वस्त विक्री करून इसिसने अर्थव्यवस्थेला दिलेले आव्हान.
  • इराक अशांत राहिल्यास तेलाचे दर भडकण्याची शक्यता.
  • सध्या इसिसपासून फारसा धोका नसला तरी भारतातील सामाजिक सलोखा, कायदा, सुव्यवस्था अस्थिर करण्याची इसिसची क्षमता.
  • कडव्या विचारसरणीच्या भारतातील मुसलमानांमध्ये इसिसबद्दल वाढते आकर्षण असल्याने या दहशतवादी संघटनेला भारतातील काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांचे ब्रेन वॉशिंग करण्यात मिळत चाललले यश पाहिले तर हा भविष्यातला धोका कायम राहणार आहे.