आगवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.


  ?आगवण

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .२४३ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर
लोकसंख्या
घनता
१,५४१ (२०११)
• ६,३४२/किमी
भाषा मराठी
सरपंच
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०४
• +०२५२५
• एमएच४८
ग्रामपंचायत पंचाळी

भौगोलिक स्थान

संपादन

हे पालघर रेल्वे स्थानकापासून बोईसरला जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे १४ किमी अंतरावर वसलेले आहे.सरावली गावानंतर ते स्थित आहे.


हवामान

संपादन

येथे उन्हाळ्यात फार उष्ण हवामान असते तर पावसाळ्यात दमट हवामान असते. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. हिवाळ्यात वातावरण शीतल असते. मुख्यतः भातशेती केली जाते. दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन हे व्यवसाय सुद्धा काही प्रमाणात केले जातात.श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते. ही भाजी अत्यंत चवदार असते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते.ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते. आदिवासी बांधवाना पावसाळ्यात हा अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर ह्या भाजीची विक्री आदिवासी समाजातील पुरुष, स्त्रिया आणि मुलेमुली करीत असतात. पालघर, बोईसर, मनोर, सफाळे, केळवे रोड, वाणगाव, डहाणू, वाडा, कुडूस, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी येथील बाजारपेठांमध्ये सुद्धा ही भाजी विक्रीसाठी उपलब्ध असते.[]

नागरी सुविधा

संपादन

गावात पाणीपुरवठा,सार्वजनिक दिवाबत्ती,स्वच्छता,सार्वजनिक आरोग्य इत्यादी अत्यावश्यक गोष्टी ग्रामपंचायत पुरविते. गावात प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.

जवळची गावे

संपादन

आगवण गावाच्या आसपास खालील गावे आहेत. कोळवडे, कुंभवली, आलेवाडी, गुंदाळी, नांदगाव तर्फे तारापूर, पंचाळी, उमरोळी, कोळगाव, दापोली, खारेकुरण, मुरबे.

संदर्भ

संपादन
  1. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
  2. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
  3. https://villageinfo.in/
  4. https://www.census2011.co.in/
  5. http://tourism.gov.in/
  6. https://www.incredibleindia.org/
  7. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  8. https://www.mapsofindia.com/
  9. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  10. https://www.weather-atlas.com/en/india-climate
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार दिनांक १८ सप्टेंबर २०२३