आकाशकंदील हा दिवाळी सणाचा विशेष मानला जातो.[१] या सणाला स्वतःच्या राहत्या घराबाहेर बाहेरच्या लोकांना दिसेल अशा उंच जागी व शक्यतोवर पूर्व दिशेस हा आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. हा आकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केला जातो. अलीकडील काळात आकर्षक प्लास्टिकचे वा कागदापासून बनवलेले आकाशकंदील विकत मिळतात.[२] दिवाळी सणानिमित्त विविध रंगाचे, प्रकारचे आकाशकंदील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असतात तसेच भारतात तयार होते असलेल्या कंदीलाना परदेशात मागणी असते.[३]भारतातील दीपावलीप्रमाणेच चीनजपानमध्येही वेगवेगळ्या प्रसंगांनुसार आकाशदिव्यांच्या वापराची प्रथा आहे.


धार्मिक महत्त्वसंपादन करा

 
भारतातील विविध प्रकारचे आकाशकंदील
 
विकण्यासाठी ठेवलेले आकाशकंदील

कार्तिक महिन्यात सूर्यास्ताच्या वेळेला घराच्या बाहेर आकाशदिवा लावावा असे हिंदू धर्मशास्त्र सांगते.घराच्या बाहेर अंगणात जमीन साररवून मध्यभागी यज्ञाला उपयोगी असे लाकूड मधोमध खड्डा खणून पुरावे.त्यावर आठ पाकळ्यांचे दिव्याचे तयार केलेले यंत्र टांगावे. या यंत्राच्या मधोमध दिवा लावावा. त्याच्या आठ पाकळ्यात आठ दिवे लावावेत आणि हा दिवा देवाला अर्पण करावा असे सांगितले आहे.[४]

 
दिवाळीसाठी वापरले जाणारे आकाशकंदील

आकाशकंदील तयार करण्याची एक कृतीसंपादन करा

आकाशकंदील घरी तयार करण्याची पद्धती महाराष्ट्र राज्यात आणि अन्य राज्यातही दिसून येते. घरातील लहान मुले दिवाळीच्या सुट्टीत घरी आकाशकंदील तयार करतात. यासाठी विविध कृती उपलब्ध आहेत.[५]

  • साहित्य-

पतंगाचा रंगीत कागद, कंपास, मापन पट्टी, पेन्सिल, कात्री, कटर, डिंक,इ. १) एखद्या जाड कागदावर १० सेंटिमीटर त्रिज्येचे गोल वर्तुळ काढून, वर्तुळाच्या परिघाचे त्रिज्येच्या मापाने ६ समान भाग करतात.
२) त्रिज्येच्या १० सेंटी मापाने परिघावर काढलेल्या ६ बिंदूंवरून वर्तुळाबाहेर परस्परांना छेदणारे कंस टाकतात, आणि हे ६ बिंदू एकमेकांना जोडतात.
३) हे बिंदू केंद्रबिंदू धरून आकृती ३ प्रमाणे परिघावर पाकळ्या तयार करतात.
४) अशी ४ वर्तुळे तयार करून कापून घेतात.
५) सर्व वर्तुळाच्या आतील गोल पाकळ्यांवर कर्कटक अथवा टोकदार वस्तू हलक्या हाताने फिरवून घेतल्या की योग्य ठिकाणी घड्या पडतात. या आकाशकंदिलाच्या सर्व घड्यांना गोलाई असते.
६) वर्तुळाच्या मध्यभागी साजेसे नक्षीकाम काढून ते कापतात व त्याला आतील बाजूस पतंगाचा रंगीत कागद चिटकवतात.
७) त्यानंतर ४ ही वर्तुळांची जोडणी करून घेतल्यावर, प्रत्येक वर्तुळाच्या २ पाकळ्या इतर एका वर्तुळाशी सामाईक असल्याचे दिसून येईल. ही जोडणी झाल्यावर आकाशकंदिलाचा मुख्य गोलाई असलेला ढाचा /त्रिमिती आकार तयार होईल.
८) आकाशकंदिलाच्या वराच्या बाजूस कंदील टांगण्यासाठी दोरा आणि खालील बाजूस झिरमिळ्या चिकटवून किंवा अधिक कल्पकता वापरून हा आकाशकंदील सजवता येतो.

संदर्भसंपादन करा

  1. ^ "esakal | Pimpri chinchwad : आकाशकंदिलांनी बाजारपेठेला झळाळी". www.esakal.com. 2021-10-26 रोजी पाहिले.
  2. ^ सय्यद, झियाउदीन (५. ११. २०१५). "कलात्मक दिवाळी". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "esakal | विक्रमगड: बांबूपासून साकारलेल्या आकाश कंदीलला अमेरिकेत डिमांड". www.esakal.com. 2021-10-26 रोजी पाहिले.
  4. ^ Upadhyaya, Kashi Nath (1886). Dharmasindhu ...
  5. ^ author/lokmat-news-network (2021-10-25). "या दिवाळीत 'असा' बनवा घरच्याघरी पटकन आकाश कंदील; दिवाळीच्या आनंदात उजळेल पर्सनल आनंदाचा आकाशदिवा!". Lokmat. 2021-10-26 रोजी पाहिले.