अर्दाबिल (फारसी: استان اردبیل , ओस्तान-ए-अर्दाबिल ; अझरबैजानी: اردبیل اوستانی ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत इराणच्या वायव्य भागात असून याच्या सीमा पूर्वेस गिलान, दक्षिणेस जंजान, पश्चिमेस पूर्व अझरबैजान प्रांतांस भिडल्या आहेत. अर्दाबिलाच्या उत्तरेकडे अझरबैजान प्रजासत्ताक वसले आहे.

अर्दाबिल
استان اردبیل
इराणचा प्रांत

अर्दाबिलचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
अर्दाबिलचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी अर्दाबिल
क्षेत्रफळ १७,८०० चौ. किमी (६,९०० चौ. मैल)
लोकसंख्या १२,४८,४८८
घनता ७० /चौ. किमी (१८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-24

इ.स. १९९३ साली पूर्व अझरबैजान प्रांताचा पूर्वेकडील प्रदेश आणि गिलान प्रांताचा उत्तरेकडील प्रदेश एकत्र करून अर्दाबिलाची निर्मिती करण्यात आली. अर्दाबिल शहर हे या प्रांताचे राजधानीचे शहर आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.