झंजान प्रांत

इराण प्रांत
(जंजान प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)

झंजान प्रांत (लेखनभेद: जंजान प्रांत) (फारसी: استان زنجان , ओस्तान-ए-झंजान ; अझरबैजानी: زنگان اوستانی ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. इराणाच्या वायव्य भागात वसलेल्या या प्रांताची राजधानी झंजान येथे आहे. प्रांताचे क्षेत्रफळ २१,७७३ वर्ग कि.मी. असून लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. प्रांतातील प्रजेत अझेरी वांशिकांचे बाहुल्य असून, त्यांच्याखालोखाल ताती व कुर्दी लोकांचे वास्तव्य येथे आहे.

झंजान प्रांत
استان زنجان
इराणचा प्रांत

झंजान प्रांतचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
झंजान प्रांतचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी झंजान
क्षेत्रफळ २१,७७३ चौ. किमी (८,४०७ चौ. मैल)
लोकसंख्या १०,१५,७३४
घनता ४७ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-19

बाह्य दुवे

संपादन
  • "झंजान प्रांतपालांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ" (फारसी भाषेत). 2017-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-08 रोजी पाहिले.