अरुणा असफ अली
स्वातंत्र्यसेनानी
(अरुणा आसफ अली या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अरुणा असफ अली (जुलै १६, १९०८ - जुलै २९, १९९६) या स्वातंत्र्यसेनानी होत्या. त्यांचे मूळ नाव अरुणा गांगुली होय. इ.स. १९४२ सालच्या चले जाव आंदोलनात गांधीजीनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या राजकारणात सक्रीय होत्या. त्या १९५८ मध्ये दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या. त्यांनी लिंक या नावाने प्रकाशन संस्था काढून वृत्तपत्रे, मासिके व पुस्तके प्रकाशित केली.[१]
पुरस्कार
संपादनअरुणा असफ अली यांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्यासाठी १९९७ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- ^ सिंग, कुलदीप (३१ जुलै १९९६). "Obituary: Aruna Asaf Ali". इंडिपेंडंट. १५ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.