अमिताभ घोष (बँकर)
अमिताभ घोष (बँकर) हे भारतीय रिझर्व बँकेचे १६ वे गव्हर्नर होते. गव्हर्नर म्हणून त्यांचा कार्यकाळ अवघ्या २० दिवसांचा होता. सगळ्यात कमी कालावधीचे गव्हर्नर म्हणून अमिताभ घोष (बँकर) ओळखले जातात. अमिताभ घोष (बँकर) हे आधी रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते. तर त्या आधी त्यांनी अलाहबाद बँकेचे चेरमन म्हणून काम पाहिले आहे आणि ते आय.डी.बी.आय. बँकेच्या संचालकांपैकी एक होते. तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजेमेन्ट या संस्थेच्या मंडळावरही होते.
हा लेख रिझर्व बँकेचे गव्हर्नर अमिताभ घोष याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अमिताभ घोष (लेखक).
अमिताभ घोष (बँकर) यांना रु. २/- (दोन सिरिज), रु. ५/- आणि रु. १०/- या नोटांवर भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून आपली सही करता आली. ए. घोष अशी छोटी स्वाक्षरी असलेल्या अमिताभ घोष (बँकर) यांच्या नोटा छंद म्हणून जमा कराणाऱ्यांमध्ये अत्यंत दुर्मिळ मानल्या जातात.
मागील: डॉ. मनमोहनसिंग |
रिझर्व बँकेचे गव्हर्नर जानेवारी १५, १९८५ – फेब्रुवारी ४, १९८५ |
पुढील: रा. ना. मल्होत्रा |
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरील गव्हर्नरांच्या माहितीचे पान Archived 2015-03-17 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |