अमिताभ घोष
Disambig-dark.svg

अमिताभ घोष (११ जुलै, इ.स. १९५६ - ) हे इंग्रजी भाषेत लिखाण करणारे बंगाली लेखक आहेत. त्यांचा जन्म भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथे झाला. त्यांचे महाविध्यालयीन शिक्षण दिल्ली विश्वविद्यालाच्या सेंट स्टीफन कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून झाले. द सर्कल ऑफ रीजन' ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बघता बघता घोष यांनी साहित्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला.