अन्वरा तैमूर
सय्यदा अन्वरा तैमूर (२४ नोव्हेंबर १९३६ - २८ सप्टेंबर २०२०) ह्या एक भारतीय राजकारणी होत्या. त्या ६ डिसेंबर १९८० ते ३० जून १९८१ दरम्यान भारतीय आसाम राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. [१] त्या आसाममधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) सदस्य होत्या. २८ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचे ऑस्ट्रेलियात निधन झाले.[२]
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर २४, इ.स. १९३६ आसाम | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर २८, इ.स. २०२० | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
वैयक्तिक जीवन
संपादनत्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. अन्वरा १९५६ मध्ये देबीचरण बरुआ गर्ल्स कॉलेज, जोरहाटमध्ये अर्थशास्त्राच्या लेक्चरर होत्या.
राजकीय कारकीर्द
संपादनआसामच्या इतिहासात त्या राज्याच्या एकमेव महिला आणि मुस्लिम मुख्यमंत्री होत्या. [३] ६ डिसेंबर १९८० ते ३० जून १९८१ पर्यंत त्या आसामच्या मुख्यमंत्री होत्या.[४] [३] भारतीय इतिहासातही सय्यदा अन्वरा तैमूर या कोणत्याही राज्याच्या पहिल्या मुस्लिम महिला मुख्यमंत्री होत्या. [५] राज्यात सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट असताना त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपला.
सन् १९७२, १९७८, १९८३ आणि १९९१ मध्ये त्या आसाम विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्य (आमदार) होत्या.[३] [४] १९८८ मध्ये त्यांना राज्यसभेत नामांकित करण्यात आले.[३] [६] १९९१ मध्ये त्यांची आसाममध्ये कृषी मंत्री पदावर नियुक्ती झाली.[७]
अन्वरा २०११ मध्ये ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये सामील झाल्या.[३]
मृत्यू
संपादन२८ सप्टेंबर २०२० रोजी ऑस्ट्रेलियात हृदयविकाराच्या झटक्याने तैमूर यांचा मृत्यू झाला, जिथे त्या त्यांच्या मुलासोबत गेली चार वर्षे राहत होत्या.[३] [४] [८] [२]
संदर्भ
संपादन- ^ "'Spurned' Taimur in AIUDF - Denied a ticket, one deserts, the other turns mentor". 1 February 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ a b "Assam's lone female chief minister Syeda Anwara Taimur passes away". The News Mill (इंग्रजी भाषेत). 2020-09-28. 2020-09-28 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f "Assam's only woman CM Syeda Anwara Taimur passes away in Australia at 83". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). Hindustan Times. 28 September 2020. 21 February 2021 रोजी पाहिले.
- ^ a b c Bikash, Singh (28 September 2020). "Syeda Anwara Taimur, the only woman chief minister of Assam, breathed her last on Monday". The Economic Times. 21 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Kudos to Mehbooba Mufti, but where are Kashmir's female politicians?". 29 March 2016.
- ^ "Archived copy" (PDF). 19 December 2019 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 13 July 2015 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
- ^ "Anwara Taimur – the First Lady CM of Assam | Sevendiary.com | Discover Northeast India - Culture, Lifestyle and Travel". 13 July 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Former Assam CM Anwara Taimur no more". News Live (इंग्रजी भाषेत). 28 September 2020. 12 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 September 2020 रोजी पाहिले.