अनारसे

(अनारसा या पानावरून पुनर्निर्देशित)

अनारसे हा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. पाण्यात पाच-सहा दिवस भिजवून आंबवलेले तांदूळ व गूळ यांपासून हा बनतो. त्यासाठी साजूक तूप, वेलदोडा, खसखस यांचाही वापर होतो. अनारसांच्या ओलसर पिठाच्या चकत्या तुपात तळण्यापूर्वी त्यांच्यावर खसखस पसरण्याची रीत आहे.[] हा विशेषतः दिवाळीत आणि अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यासाठी बनवतात. हा पदार्थ महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्येही लोकप्रिय आहे. पंजाबमध्ये बहुधा खसखस वापरत नाहीत.

संस्कृतमध्ये अनरश्याला अपूप म्हणतात.[] सामान्यपणे दीपावलीच्या सणात महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये बनविल्या जाणाऱ्या विविध उपहारांतील हा एक पदार्थ आहे.[] महाराष्ट्रात विशेषकरून अधिक मास काळात जावयाला ३३ अनारसे भेट देण्याची पद्धती आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "अनारसा". 2021-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-05-13 रोजी पाहिले.
  2. ^ "दीवाली पर बनती है ये स्पेशल मिठाई".
  3. ^ "चेंजिंग डाइटरी पैटर्न्स एंड हैबिट्स : अ सोसिओ-कल्चरल स्टडी ऑफ़ बिहार".