वेलदोडे

(वेलदोडा या पानावरून पुनर्निर्देशित)

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या फळास वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची किंवा एला असेही म्हणतात.

छोटी विलायची (डावीकडे) आणि मोठी विलायची(उजवीकडे)

वेलदोडा हा मसाल्याचा एक प्रकार आहे. ह्याचा वास खूप सुंदर असतो. वेलदोडा साधारणपणे गोड खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. विड्याच्या पानातही वेलदोडा टाकतात. याशिवाय मसालेभात, पुलाव, बिर्याणी यांत वेलदोड्याचा बडी इलायचीनामक प्रकार वापरला जातो.

वेलची
वेलची

ही वनस्पती मूळची भारतातली आहे. सुमारे आठव्या शतकाच्या आसपास वेलदोड्याचा शोध लागला असावा असा एक मतप्रवाह आहे. प्रामुख्याने भारतात व श्रीलंकेत वेलचीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. नेपाळ, ग्वाटेमाला, मेक्सिको, थायलंड व मध्य अमेरिकेतही या पिकाचे उत्पादन घेतले जाते.

उपयोग

संपादन

वेलदोडा हे मुखदुर्गंधीनाशक, उलटी थांबवणारे, तहान कमी करणारे, भूक वाढवणारे व पाचक गुणाचे औषध आहे असे मानले जाते. भावप्रकाश या आयुर्वेदीय ग्रंथात दमा, खोकला, मुळव्याध, मूत्रविकार यामध्ये वेलदोडे उपयोगी आहेत, असे वर्णन आढळते.