आदिलशाही

१४९० ते १६८६ पर्यंत विजापूरची सल्तनत म्हणून नैऋत्य भारतावर राज्य करणारे मुस्लिम राजवंश
(अदिलशाही या पानावरून पुनर्निर्देशित)

आदिलशाही सल्तनत ही दख्खनेत इ.स.१४९० ते इ.स. १६८० पर्यंत अस्तित्वात असलेली एक सल्तनत होती. विजापूर येथे या राज्याची राजधानी होती. आदिलशाही अस्तित्वात येण्यापूर्वी विजापूर हा बहमनी सल्तनतचा (१३४७-१५१८) एक भाग होता. १२ सप्टेंबर, १६८६ रोजी मोगल सम्राट औरंगजेब याने आदिलशाहीचा पाडाव करून हा भाग मोगल साम्राज्यात विलीन केला.

ಬಿಜಾಪುರ ಸಲ್ತನತ್
आदिलशाही सल्तनत
بیجاپور سلطنت
px

१४९० - १६८६
राजधानी विजापूर
राजे १४९० - १५१०: युसूफ आदिलशाह
भाषा दख्खनी
क्षेत्रफळ वर्ग किमी

आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिल शाह (१४९०-१५१०) हा बहमनी सल्तनतच्या काळात विजापूरचा सुभेदार होता. त्याने बहमनी सल्तनतचे वर्चस्व झुगारून आदिलशाहीची स्थापना केली.

आदिलशाहीचा विस्तार महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून हिंदुस्थानच्या दक्षिण टोकापर्यंत होता.