अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
(अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ - १७२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अणुशक्ती नगर मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र.२०८० मधील इन्युमरेशन ब्लॉक ६० ते १११, १२४ ते १७८, १८० ते ५९४, ८०० ते ८०४, ८०६, ८०७, १०४९ ते १०५७, ११९० ते १९९९, १२१४ ते १२२४, १२२७, १२२९, १२३१, ३३०१ आणि ३३०२ यांचा समावेश होतो. अणुशक्ती नगर हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मोहम्मद इस्लाम मलिक हे अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ नवाब मोहम्मद इस्लाम मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ तुकाराम रामकृष्ण काटे शिवसेना
२००९ नवाब मोहम्मद इस्लाम मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".