अचानकमार वन्यजीव अभयारण्य
छत्तीसगढ राज्यातील विलासपूर जिल्ह्यात बिलासपूर ते अमरकंटक रस्त्यावर असलेले अचानकमार अभयारण्य सुमारे ५५० चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरले असून, १९७५ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. अचानकमार वन्यजीव अभयारण्य हे कान्हा राष्ट्रीय उद्यानाशी कान्हा-अचानकमार नावाच्या टेकड्यांच्या रांगांनी जोडलेले आहे.
अचानकमार वन्यजीव अभयारण्य हे विलासपूर शहरापासून ५५ कि. मी. अंतरावर आहे आणि नर्मदा नदीचे उगमस्थान असलेले अमरकंटकही येथून जवळच आहे.
या अभयारण्यात बांबू, साल, साजा, बिजा ही मुख्य झाडे आणि वाघ, बिबट्या, रानगवा हे मुख्य प्राणी आढळतात.
चित्रदालन
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
संपादन- छत्तीसगढ शासनाचे संकेतस्थळ Archived 2017-06-11 at the Wayback Machine.
- छतीसगढ पर्यटन मंडळाचे संकेतस्थळ Archived 2016-11-13 at the Wayback Machine.