अंजनी धरण हे उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील एक धरण आहे. महाराष्ट्र शासनाच्या मानांकनानुसार, हा एक मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहे. हे अंजनी नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे एरंडोल गावानजिक आहे. हे मातीचे धरण असून त्याची लांबी सुमारे ४३१६ मीटर इतकी आहे. हे धरण १९७० मध्ये पूर्ण झाले. हे भूकंपप्रवण क्षेत्र-२ अंतर्गत येते.[]

अंजनी धरण
अधिकृत नाव अंजनी धरण
धरणाचा उद्देश सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
अंजनी नदी
स्थान एरंडोल गावाजवळ
सरासरी वार्षिक पाऊस ७००.२८ मिमी[]
लांबी ४३१६ मीटर
उंची १५.६ मीटर
जलाशयाची माहिती
निर्मित जलाशय अंजनी जलाशय
क्षमता ३३.००८ मि.क्यु.मी.
जलसंधारण क्षेत्र २३४.३४ चौ. किमी
भौगोलिक माहिती
निर्देशांक 75°12′N 20°33′E / 75.20°N 20.55°E / 75.20; 20.55
व्यवस्थापन महाराष्ट्र शासन, पाटबंधारे विभाग
संकेतस्थळ भारताची जलस्रोत माहिती प्रणाली

हे सुद्धा पहा

संपादन