अंगिका भाषा
भारत आणि नेपाळमध्ये बोलली जाणारी भाषा
अंगिका ही भारत देशामधील एक भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील मैथिली भाषेची एक आवृत्ती असलेली अंगिका भाषा प्रामुख्याने बिहार व झारखंड राज्यांच्या अंग प्रदेशात व पूर्व नेपाळमध्ये वापरली जाते. सुमारे १.५ कोटी भाषिक असलेल्या अंगिका भाषेचा भारताच्या २२ राजकीय भाषांमध्ये समावेश केला गेला नसला तरीही २०१८ सालापासून ती झारखंड राज्याच्या १६ राजकीय भाषांपैकी एक आहे.
अंगिका | |
---|---|
स्थानिक वापर | भारत |
लोकसंख्या | ३.५ कोटी |
भाषाकुळ | |
लिपी | देवनागरी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
भारत झारखंड |
भाषा संकेत | |
ISO ६३९-२ | anp |
ISO ६३९-३ | anp |