देवनागरी ऱ्हस्व मुळाक्षर

(आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती/ə/or/ä/)

हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. अ हा १२ स्वरांपैकी एक 'ऱ्हस्व स्वर' आहे.

मराठी वर्णमालेतील मूलध्वनी, पहिला वर्ण, पहिला स्वर असलेल्या 'अ' चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतप्रमाणे 'अ' चा दीर्घोच्चार 'आ' होत नाही.[१][२] संत ज्ञानेश्वर 'अ' काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात. 'अ' हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिकरित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिलच्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे.

'अ' हे अक्षर देवनागरी लिपीत
'अ' हे अक्षर देवनागरी लिपीत

उच्चार

संपादन
उच्चारस्थान :कंठ.

अ हा स्वर English मध्ये a असा वापरतात.[३][३]

 • 'अ' या स्वरास एकच वर्ण चिन्ह असले तरी एक पेक्षा अधिक उच्चार होतात.
  • "गवत" या शब्दात 'ग' मध्ये 'अ'चा पूर्णोच्चार होतो.
  • 'व' मध्ये 'अ'चा लांबट उच्चार होतो;
  • 'त' मध्ये 'अ'चा अपूर्णोच्चार, तोकडा म्हणजे निभृत स्वरुपाचा होतो.
  • "सहल","सफल","चपल" हे शब्दसुद्धा अशाच पद्धतीचा आहे.
 • मराठी शब्दातील अंत्य 'अ'चा स्वराचा उच्चार अपूर्ण होतो.

उदा. कपा,पा,जव,पाऊ

 • 'अ' कारान्त नसलेल्या इतर शब्दातील उपान्त्य अक्षर 'अ' स्वराने युक्त असेल तर ते अपूर्ण उच्चारले जाते.

उदा. नटा,पोले,बोणी

 • चार अक्षरी शब्दातील दुसऱ्या अक्षरातला 'अ'चा उच्चार अपूर्ण होतो.

उदा: कवत,सकार,चावत

उदा:

राम 'व' लक्ष्मण
त्याला 'ग'ची बाधा झाली आहे.
हा मुलगा 'ढ' आहे.
 • 'अ'कारान्ता पूर्वीचे स्वर मराठीत दीर्घोच्चार होतो.

उदा:

ट,
 • दीर्घान्तापूर्वीचे स्वर ऱ्हस्व उच्चारले जातात

उदा:

 • तत्सम शब्दातील अंत्य 'अ'चा स्वरोच्चार पूर्णोच्चार असतो

उदा :

गु , वि , मंदि , सु , गृ, निर्झ , नृ
 • जोडाक्षर,अनुस्वार, व विसर्ग यानंतरचा 'अ' तोकडा किंवा निभृत नसतो.

उदा :

डिं,चिं,भिं,शिस्त,गुच्छ,शिल्ल,दुः,निःसंशय

पदान्तीचा दीर्घ अकार

संपादन

संवादलेखनात येणाऱ्या नपुंसकलिंगी मराठी शब्दाच्या शेवटी येणारा (एके काळी अनुस्वारयुक्त लिहिला जाणारा आणि कोकणी लोकांकडून अनुनासिक उच्चारला जाणारा) एकार (उदा० 'गाव' याचे अनेकवचन 'गावें'; 'जसें'; 'कसें') हा संभाषणात पुष्कळदा दीर्घ अकार होऊन येतो. या दीर्घ अकारासाठी अनुस्वाराचेच चिह्न (म्हणजे अक्षराच्या डोक्यावर दिले जाणारे भरीव टिंब) वापरण्याचा प्रघात असे. (गावें ऐवजी गावं; जसें ऐवजी जसं आणि तसें ऐवजी तसं).नपुंसकलिंगी शब्दांच्या अंती येणाऱ्या ’ए’काराच्या मात्रेऐवजी अनुस्वार देत.हा अनुस्वार दर्शीत उच्चार दीर्घच नव्हे तर उंच जाणाऱ्या ’अ’कारासारखा होतो. गावं या शब्दाचा उच्चार नुसता गावऽ असा होत नाही तर, गावऽ↑ असा होतो. हा उच्चार करताना जीभ तोंडाच्या वरच्या भागाला स्पर्श करते.

म्हणजेच, एकच चिह्नाचे दोन पूर्णतः अलग उच्चार होतात. दाखल्यादाखल, - 'टिंब', 'संबंध' या शब्दांमधले टिंब हे अनुस्वारदर्शक आहे, तर 'जसं', 'मधलं' यांमधले टिंब हे पदान्तीचा दीर्घ अकार दाखवणारे असे.

शुद्ध लेखनाच्या १९६२ सालच्या नियमांनी नपुंसकलिंगी शब्दांच्या अन्त्य एकारावरच्या अनुस्वारांना, ते अनुस्वारित आहेत असे समजून बाद केले. बोली भाषेतल्या केलं, गेलं या शब्दांतल्या अनुस्वारांना बाद केलेले नाही.(नियम क्र. १३ असे लिहिण्याला परवानगी देतो.) त्यासंबंधी काही संकेत पाळावे असे त्या नियमांच्या जेव्हा चर्चा झाल्या तेव्हा सांगण्यात आले.

प्रमाणलेखन संकेतानुसार केलं, गेलं सारखी रूपे संवादांतले प्रत्यक्ष उच्चार लिहून दाखवितानाच वापरतात, किंवा संपूर्ण लेखच बोली भाषेत असेल तर वापरतात.प्रमाणलेखन संकेतानुसार लेखातील काही शब्द प्रमाण भाषेत आणि काही बोली भाषेत असे लिहू नये. वैचारिक विषयांवरचे लिखाण जगातील मराठी जाणणारे सर्वजण वाचत असल्याने, त्यांत प्रादेशिक बोली भाषेतील केलं, गेलं असले शब्द असू नयेत. अर्वाचीन आणि प्रचलित मराठीबाबत अनभिज्ञ असणाऱ्या लोकांना त्या शब्दांचा अर्थ न समजण्याची शक्यता असते.[ संदर्भ हवा ]

 • 'अ' शालेय गट/तुकडी/वर्ग निदर्शक
 • वर्णमाला वापरून केलेल्या क्रम निदर्शनातील प्रथम क्रमांक
 • वर्णमाला वापरून केलेल्या क्रमवार दर्जा निदर्शनातील प्रथम क्रमांक दर्जा /गुणवत्ता.

ने चालू होणारे शब्द

संपादन
अभाव, अकारण , अनैतिक,अज्ञान,अगातिक,अप्राप्य, अस्थानी, अदृश्य,अद्वितीय .(शुद्धलेखन तपासा आणि बरोबर करा)
 • "अ" अती याअर्थाने "अचपल मन माझे।नावरे आवरीता"(करुणाष्टक)
अविपरीत (शुद्धलेखन तपासा आणि बरोबर करा)
अगणित ,असंख्य अजय,अजेय,

इतर भारतीय भाषा

संपादन
}

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
 1. ^ सुलभ मराठी व्याकरण लेखन ':मो.रा.वाळंबे
 2. ^ "मराठी व्याकरण": डॉ. लीला गोविलकर
 3. ^ a b "Wikipedia". www.wikipedia.com. 2018-03-28 रोजी पाहिले.

साचा:मराठी भाषेतील वर्णमाला

NLAC IPA Devanagari Bengali Gurmukhi Gujarati Oriya Tamil Telugu Kannada Malayalam
a ə - - - - - - - - -