- मराठी वर्णमालेतील आणि स्वरमालेतील दुसरे अक्षर.उच्चारस्थान : कंठ
- लांबट उच्चार- आ S S S
- ऱ्हस्व उच्चार :आमचा
- तोंड उघडे ठेवणे या अर्थाने-तिने आश्चर्याने 'आ' वासला
- आ हा उपसर्ग (अव्यय) मर्यादादर्शक आहे.उदा. आसमुद्र,आमरण,आजन्म,आकंठ
- सामान्य रूपाचा प्रत्यय उदा. 'घरा'कडे (घर+आ)
- पुल्लिंगी प्रत्यय उदा. घोडा( घोड+आ) .पण घोडदळ,घोडनवरा इत्यादी सामासिक शब्दात 'आ'चा लोप होतो.
- मोठे आकारमान या अर्थी प्रत्यय उदा. डबी-डबा,गोळी-गोळा(संदर्भ:प्रा.ग.ना.जोगळेकर)
- शरण येणे भाग पाडणे उदा. नाक दाबले म्हणजे 'आ'वासतो.
- विशिष्ट आवाज , उदा. 'गायकाच्या 'आ'कारान्त ताना विशेषतः लक्षात राहतात.
- आ॥ 'आशीर्वाद' शब्दाचा संक्षेप
- कबुतरांना बोलवण्यासाठी हा शब्द मोठ्याने उच्चारतात.
- पुर्वी याचा उपयोग षष्ठीचा प्रत्यय म्हणून काव्यात करीत.उदा.'तंव तो धारा सिंचे तिंखटे। डोळे 'आ' उजू॥(भास्करभट।मराठी कोश)
- स्पष्टीकरणार्थ ,आवश्यकता नसतानाही येणारा उपसर्ग उदा. आकांक्षा ,आकाश,आभाळ
- ऑं- तो ती,ते या अर्थाने बखरीत वापर केला जात असे.
- कृदंत प्रत्यय उदा.- बोलता,चालता,
- ऑं प्रश्नार्थक उद्गार- ऑं काय म्हणालास?
- 'आ' विसर्गयुक्त उद्गार विविध भाव दर्शक आहे -जसे वेदना,वेदनाशमन,
- ज्ञानेश्वरीतील उपयोग आ-ब्रम्ह,आ-प्लविजे,आ-पादकंचुकित,आ-पाद