१९९१ युरोप महिला क्रिकेट चषक
१९९१ युरोप महिला क्रिकेट चषक ही एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १६-२० जुलै १९९० दरम्यान नेदरलँड्समध्ये आयोजित केली गेली होती. युरोपियन क्रिकेट संघटनेद्वारे सुरू केलेल्या युरोप महिला क्रिकेट चषक स्पर्धेची ही तिसरी आवृत्ती होती. सर्व सामन्यांना महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा होता. यजमान नेदरलँड्ससह डेन्मार्क, आयर्लंड आणि इंग्लंड या चार देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला.
१९९१ युरोप महिला क्रिकेट चषक | |||
---|---|---|---|
क्रिकेट प्रकार | महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५५ षटके) | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि अंतिम सामना | ||
यजमान | नेदरलँड्स | ||
विजेते | इंग्लंड (३ वेळा) | ||
सहभाग | ४ | ||
सामने | ७ | ||
सर्वात जास्त धावा | वेंडी वॉट्सन (२२९) | ||
सर्वात जास्त बळी | जो चेम्बरलेन (१२) | ||
|
स्पर्धा गट फेरी आणि अंतिम सामना या पद्धतीने खेळवली गेली. सर्व संघांनी एकमेकांशी एक सामना खेळला. गुणफलकात इंग्लंड अव्वल राहत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. डेन्मार्क महिलांनी दुसरे स्थान मिळवत इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना खेळला. अंतिम सामन्यात इंग्लंड महिलांनी डेन्मार्कवर १७९ धावांनी विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा युरोप महिला क्रिकेट चषक जिंकला. इंग्लंडची वेंडी वॉट्सन ही सलग दुसऱ्यावर्षीसुद्धा स्पर्धेत सर्वाधिक २२९ धावा करत आघाडीची खेळाडू ठरली. तर तिचीच संघ सहकारी जो चेम्बरलेन स्पर्धेत सर्वाधिक १२ गडी मिळवत आघाडीची गोलंदाज ठरली.
गुणफलक
संपादनसंघ
|
खे | वि | प | ब | अ | र | गुण | रनरेट | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
इंग्लंड | ३ | ३ | ० | ० | ० | ० | ६ | ३.०९२ | अंतिम सामन्यासाठी पात्र |
डेन्मार्क | ३ | १ | २ | ० | ० | ० | २ | २.१७६ | |
आयर्लंड | ३ | १ | २ | ० | ० | ० | २ | १.९८२ | |
नेदरलँड्स | ३ | १ | २ | ० | ० | ० | २ | १.८७५ |
गट फेरी
संपादन १६ जुलै १९९१
धावफलक |
वि
|
डेन्मार्क
१२२ (५४.२ षटके) | |
- नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- नेदरलँड्सच्या भूमीवर डेन्मार्कचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- कॅरोलाइन डि फाउ (ने) आणि डॉर्टे क्रिस्चियनसेन (डे) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१६ जुलै १९९१
धावफलक |
वि
|
आयर्लंड
१०२ (५२.२ षटके) | |
- नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- नेदरलँड्सच्या भूमीवर इंग्लंड आणि आयर्लंडचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- निक्की स्क्वेअर (आ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१७ जुलै १९९१
धावफलक |
वि
|
आयर्लंड
९० (४९ षटके) | |
- नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- ५५ षटकांचा सामना.
- डेन्मार्क महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात आयर्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
१७ जुलै १९९१
धावफलक |
वि
|
नेदरलँड्स
८८/९ (५५ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- ५५ षटकांचा सामना.
- रीम्के स्चीपस्ट्रा, सँड्रा कोटमन (ने), जॅनेट गॉडमन आणि मारी मोराली (इं) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१९ जुलै १९९१
धावफलक |
वि
|
नेदरलँड्स
७२ (४२.४ षटके) | |
- नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.
- ५५ षटकांचा सामना परंतु ४५ षटकांचा खेळवण्यात आला.
अंतिम सामना
संपादन