१९८९ युरोप महिला क्रिकेट चषक
१९८९ युरोप महिला क्रिकेट चषक ही एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १९-२१ जुलै १९८९ दरम्यान डेन्मार्कमध्ये आयोजित केली गेली होती. युरोपियन क्रिकेट संघटनेद्वारे सुरू केलेल्या युरोप महिला क्रिकेट चषक स्पर्धेची ही पहिली आवृत्ती होती. सर्व सामन्यांना हे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा होता. यजमान डेन्मार्कसह, इंग्लंड, आयर्लंड आणि नेदरलँड्स या चार देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. नायकाबिंग मोर्स मधील नायकाबिंग मोर्स क्रिकेट क्लब मैदानवर सर्व सामने झाले.
१९८९ युरोप महिला क्रिकेट चषक | |||
---|---|---|---|
क्रिकेट प्रकार | महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५५ षटके) | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी | ||
यजमान | डेन्मार्क | ||
विजेते | इंग्लंड (१ वेळा) | ||
सहभाग | ४ | ||
सामने | ६ | ||
मालिकावीर | जो चेम्बरलेन | ||
सर्वात जास्त धावा | वेंडी वॉट्सन (१२४) | ||
सर्वात जास्त बळी | जो चेम्बरलेन (१०) | ||
|
डेन्मार्क महिला संघाने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. तसेच डेन्मार्कमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. सदर स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. प्रत्येक संघाने इतर संघांशी एक सामना खेळला. इंग्लंडने सर्व तीन सामन्यांमध्ये विजय मिळवत स्पर्धा जिंकली. डेन्मार्कला सरासरी धावगतीच्या जोरावर २ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या जो चेम्बरलेन हिला सर्वाधिक गडी बाद केल्यामुळे मालिकावीर घोषित केले गेले. इंग्लंडच्याच वेंडी वॉट्सन हिने स्पर्धेत सर्वाधिक १२४ धावा केल्या.
गुणफलक
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
इंग्लंड (विजयी) | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | ३.३६१ |
डेन्मार्क | ३ | १ | २ | ० | ० | २ | २.२८६ |
नेदरलँड्स | ३ | १ | २ | ० | ० | २ | २.०९२ |
आयर्लंड | ३ | १ | २ | ० | ० | २ | २.०१९ |
गट फेरी
संपादन १९ जुलै १९८९
धावफलक |
वि
|
आयर्लंड
१२१/३ (५१.५ षटके) | |
- नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- डेन्मार्क महिलांचा पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- डेन्मार्क आणि आयर्लंड या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- डेन्मार्कमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
- आयर्लंडने डेन्मार्कमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- आयर्लंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात डेन्मार्कवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- ट्राईन क्रिस्चियनसेन, ॲनी-मेट फर्नांडिस, लेन हॅन्सेन, जानी जॉनसन, सुझॅन जॉर्गरसेन, बेटीना लँगरहूस, लिली लॉरसेन, सुझॅन नील्सन, विबेक नील्सन, मार्लेन स्लॅबॅजर, शार्लोट स्मिथ (डे) आणि अॅनी लाईहान (आ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
१९ जुलै १९८९
धावफलक |
वि
|
इंग्लंड
९२/३ (३१.१ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- इंग्लंड आणि नेदरलँड्सने डेन्मार्कमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- कॅथी कूक, हेलेन प्लीमर (इं), एरिएट व्हान नूरटविजक, एडमी जॅन्स, गीशे लुडविग, कॅरेन व्हान रिजन आणि मॅडेलिन लोमन (ने) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२० जुलै १९८९
धावफलक |
वि
|
नेदरलँड्स
११४/६ (५३.४ षटके) | |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
- नेदरलँड्स महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात आयर्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२० जुलै १९८९
धावफलक |
वि
|
डेन्मार्क
९३/९ (५१ षटके) | |
- नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ५१ षटकांचा खेळविण्यात आला.
- डेन्मार्क आणि इंग्लंड या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- इंग्लंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात डेन्मार्कवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- शार्लोट कॉर्नेलियसन (डे) आणि जुली क्रम्प (इं) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२१ जुलै १९८९
धावफलक |
वि
|
नेदरलँड्स
१३५ (५३.५ षटके) | |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
- डेन्मार्क आणि नेदरलँड्स या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- डेन्मार्क महिलांचा पहिल वहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
- डेन्मार्क महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नेदरलँड्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.