१९८४ लोकसभा निवडणुका

Elecciones generales de India de 1984 (es); ভারতের সাধারণ নির্বাচন, ১৯৮৪ (bn); élections législatives indiennes de 1984 (fr); eleccions legislatives índies de 1984 (ca); १९८४ लोकसभा निवडणुका (mr); Parlamentswahl in Indien 1984 (de); ୧୯୮୪ ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ (or); splošne volitve v Indiji leta 1984 (sl); 1984年インド総選挙 (ja); Parlamentsvalet i Indien 1984 (sv); بھارت کے عام انتخابات، 1984ء (ur); הבחירות ללוק סבהה (1984) (he); Pemilihan umum India 1984 (id); 1984 Indian general election (en); भारतीय आम चुनाव, १९८४ (hi); 1984 భారత సార్వత్రిక ఎన్నికలు (te); ਭਾਰਤ ਦੀਆਂ ਆਮ ਚੋਣਾਂ 1984 (pa); ১৯৮৪ৰ ভাৰতৰ সাধাৰণ নিৰ্বাচন (as); الانتخابات العمومية الهندية 1984 (ar); ełesion lejislative de Ìndia del 1984 (vec); 1984 இந்தியப் பொதுத் தேர்தல் (ta) élections en Inde (fr); בחירות בהודו (he); general election in India (en); Wahl zur 8. Lok Sabha 1984 (de); ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ (or); general election in India (en); انتخاباتِ عمومية جرت في الهند سنة 1984 (ar); ভাৰতৰ সাধাৰণ নিৰ্বাচন (as); இந்தியாவில் பொதுத் தேர்தல் (ta) 1984年選挙 (ja); הבחירות בהודו (1984) (he); ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ, ୧୯୮୪ (or)

१९८४ च्या लोकसभा निवडणुका या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर २४, २७ आणि २८ डिसेंबर १९८४ रोजी भारतात घेण्यात आल्या. तरीही चालू बंडामुळे आसाम आणि पंजाबमधील मतदान १९८५ पर्यंत लांबले होते.

१९८४ लोकसभा निवडणुका 
general election in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारभारतीय सार्वत्रिक निवडणुका
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागभारत
तारीखडिसेंबर २४, इ.स. १९८४, डिसेंबर २७, इ.स. १९८४, डिसेंबर २८, इ.स. १९८४
मागील.
पुढील
यशस्वी उमेदवार
उमेदवार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

या निवडणुकीत राजीव गांधी (इंदिरा गांधींचे पुत्र) यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) पक्षाने प्रचंड विजय नोंदवला, व ५१४ जागांपैकी ४०४ जागा जिंकल्या आणि विलंब झालेल्या जागांमधुन आणखी १० जागा जिंकल्या. आंध्र प्रदेश राज्यातील प्रादेशिक राजकीय पक्ष एन.टी. रामाराव यांचा तेलुगू देसम पक्ष ३० जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. अशा प्रकारे राष्ट्रीय विरोधी पक्ष बनण्याचा हा पहिला प्रादेशिक पक्षाचा मान मिळवला. तामिळनाडूच्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमने काँग्रेससोबत युती करून १२ जागा जिंकल्या.[]

नोव्हेंबरमध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आणि १९८४ च्या शीखविरोधी दंगलीनंतर लगेचच मतदान घेण्यात आले आणि गांधींच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शोक झाल्यामुळे बहुतांश भारतीय मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला.

१९८४ नंतर २०१४ मध्येच एखाच्या पक्षाने बहुमताने जागा जिंकल्या होत्या आणि आजपर्यंतची ही एकमेव वेळ होती ज्यामध्ये एका पक्षाने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या.

निकाल

संपादन
 
भारताचा निकाल (पंजाब व आसाम सोडून)[]
राजकीय पक्ष मते जागा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 115478267 ४०४
तेलुगू देशम पक्ष 10132859 ३०
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) 13809950 २२
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम 3968967 १२
जनता पक्ष 16210514 १०
भारतीय कम्युनिस्ट पक्ष 6363430
भारतीय काँग्रेस (समाजवादी) 3577377
क्रांतिकारी समाजवादी पक्ष 1173869
लोकदल 14040064
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स 1010243
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक 1055556
केरळ काँग्रेस (जोसेफ) 598113
इंडियन युनियन मुस्लिम लीग 658821
भारतीय जनता पक्ष 18202853
द्रविड मुन्नेत्र कळघम 5695179
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (जगजीवन) 1511515
शेतकरी कामगार पक्ष 463963
अपक्ष 18623803
नामांकित अँग्लो-इंडियन -
वैध मते 235,184,209 ५१६
अवैध मते 6,062,678 -
एकूण मते 241,246,887 -
वैध मतदार 379,540,608 -

आसाम आणि पंजाबमधील निवडणुका

संपादन

२४ जुलै १९८५ रोजी पंतप्रधान राजीव गांधी आणि अकाली दलाचे नेते हरचंद सिंग लोंगोवाल यांच्यात राजीव-लोंगोवाल करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सप्टेंबर १९८५ मध्ये पंजाबमधील निवडणुका झाल्या. पंजाब विधानसभेच्या निवडणुकांसोबतच या निवडणुका झाल्या.[] ऑगस्ट १९८५ मध्ये आसाम करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर डिसेंबर १९८५ मध्ये आसाममध्ये निवडणुका झाल्या.[]

पंजाब व आसामचा निकाल[]
राजकीय पक्ष मते जागा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 4628777 १०
शिरोमणी अकाली दल 2577279
भारतीय काँग्रेस (समाजवादी) 457705
प्लेन ट्रायबल्स काउंसिल ऑफ आसाम 310150
अपक्ष 4864958
वैध मते 14,401,125 २७
अवैध मते 646,951 -
एकूण मते 15,048,076 -
वैध मतदार 20,834,725 -

संदर्भ

संपादन
  1. ^ Kumaresan, S. (2019-03-04). "AIADMK- Congress combine ride on sympathy wave in 1984". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-05-19 रोजी पाहिले.
  2. ^ ECI
  3. ^ a b Narain, Iqbal (1986). "India in 1985: Triumph of Democracy". Asian Survey. 26: 253–269. doi:10.2307/2644461.
  4. ^ ECI