हॅम्पडेन पार्क
हॅम्पडेन पार्क (इंग्लिश: Hampden Park) हे स्कॉटलंड देशाच्या ग्लासगो शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ५२,०२५ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम स्कॉटलंडचे राष्ट्रीय मैदान असून स्कॉटलंड फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथून खेळतो. हे स्टेडियम क्वीन्स पार्क एफ.सी. ह्या फुटबॉल क्लबच्या मालकीचे आहे.
हॅम्पडेन पार्क | |
---|---|
स्थान | ग्लासगो, स्कॉटलंड, युनायटेड किंग्डम |
बांधकाम पूर्ण | इ.स. १९०३ |
पुनर्बांधणी | इ.स. १९९९ |
आसन क्षमता | ५२,०२५ |
विक्रमी प्रेक्षकसंख्या | १,४९,५४७ (स्कॉटलंड v इंग्लंड, १७ एप्रिल १९३७) |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
क्वीन्स पार्क एफ.सी. स्कॉटलंड फुटबॉल संघ |
आजवर येथे युएफा चँपियन्स लीगचे तीन अंतिम सामने, युएफा कप विनर्ज कप स्पर्धेचे दोन अंतिम सामने तर युएफा युरोपा लीगचा एक अंतिम सामना खेळवण्यात आले आहेत. २०१४ राष्ट्रकुल खेळ स्पर्धांसाठी सेल्टिक पार्कसोबत हॅम्पडेन पार्क हे मुख्य स्थान असेल.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत