हिमंत बिस्व शर्मा

(हिमन्त बिश्व शर्मा या पानावरून पुनर्निर्देशित)

हिमन्त बिश्व शर्मा (असमीया: হিমন্ত বিশ্ব শৰ্মা), १ फेब्रुवारी १९६९) हे भारत देशाच्या आसाम राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

हिमन्त बिश्व शर्मा

विद्यमान
पदग्रहण
२८ जुलै २०२१
राज्यपाल जगदीश मुखी
मागील सर्बानंद सोनोवाल

जन्म १ फेब्रुवारी, १९६९ (1969-02-01) (वय: ५५)
जोरहाट, आसाम,भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (२०१५ ते चालू)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९९१ ते २०१५)

पेशाने वकील असलेले सरमा १९९६ ते २००१ दरम्यान गुवाहाटी उच्च न्यायालयामध्ये वकील होते. २००१ साली ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाक्डून सर्वप्रथम आसाम विधानसभेवर निवडून आले. त्यांनी तरुण गोगोई मंत्रीमंडळामध्ये अनेक मंत्रीपदे सांभाळली. २०१५ साली राहुल गांधी ह्यांच्या नेतृत्वाबद्दल असंतोष व्यक्त करून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१६ आसाम विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा पराभव करण्यामध्ये आघाडीची भूमिका निभावली होती.

२०२१ आसाम विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपने सत्ता राखली व सरमा ह्यांना मुख्यमंत्रीपदी निवडण्यात आले.

बाह्य दुवे

संपादन