हिंदू विवाह कायदा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
या कायद्याची संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली संसदेत केली होती. पण सर्व सनातनी हिंदूंच्या विरोधामुळे हा कायदा रखडला म्हणूनच बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
act by Indian parliament governing Marriages & Divorce applicable to Hindus, Buddhists, Jains, and Sikhs | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | Act of the Parliament of India, marriage law | ||
---|---|---|---|
कार्यक्षेत्र भाग | भारत | ||
वापरलेली भाषा | |||
| |||
हिंदू कोड बिल (हिंदू कायद्यांचा मसुदा)च्या अंतर्गत १९५५ साली हिंदू विवाह कायदा स्थापित झाला. याच कालावधीत महत्त्वाच्या ३ इतर कायद्यांचीही निर्मिती झाली. ते ३ कायदे म्हणजे - हिंदू वारसाहक्क कायदा (१९५६) , हिंदू अल्पसंख्यांक आणि पालकत्व कायदा (१९५६), हिंदू दत्तकविधान आणि निर्वाह कायदा (१९५६). सद्य हिंदू कायदा पद्धतीचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कायदे मांडले गेले.
उद्देश
संपादनहिंदू कोड बिल (हिंदू कायद्यांचा मसुदा)च्या अंतर्गत हिंदू विवाह कायदा संसदेमध्ये १९५५ मध्ये आणला गेला. याचा उद्देश हिंदू लोकांचे वयक्तिक आयुष्य, विशेषतः समाजातील लग्न व्यवस्था, त्याची कायदेशीर वैधता, अवैधातेच्या अटी आणि व्यवहार्यता यांना नियमाच्या चौकटीत बसवणे आणि कायद्यात तरतूद करून देणे हा आहे.
हा कायदा कोणाला लागू पडतो
संपादनभारतीय राज्यघटनेच्या ४४ व्या कलमानुसार, जैन, बुद्ध, शीख ह्याना सुद्धा यात समाविष्ट केलेले आहे.[१]
अटी
संपादनविवाहाच्या अटी विभाग ५ मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत त्या अश्या: "दोघांनाही पती/पत्नी नसेल तरच दोन हिंदू विवाह बद्ध होऊ शकतात" असे नमूद करून हा कायदा सूचकपणे बहुपत्नीकत्वाला प्रतिबंध करतो. विवाह योग्य वय - वधूचे १८ आणि वरचे २१ असेल तरच ते विवाहास पात्र ठरतात.[२][३] हा कायदा काही विशिष्ट अमान्य नात्यातील विवाहाला प्रतिबंधित करते.
पालकत्व
संपादनविवाह कायद्याचा विभाग ६ विवाहातील संरक्षक बाबींची माहिती देतो. विवाहात जिथे वधूचे पालकत्व घेणाऱ्याची गरज लागते तिथे खालील लोकांचा पालक म्हणून स्वीकार केला जाऊ शकतो - वडील, आई, वडिलांची आई, वडिलांचे वडील, सख्खा भाऊ, चुलत भाऊ.[४] १९७८ साली बाल-विवाह प्रतिरोधक कायदा संमत झाल्या नंतर पालकत्वाचा कायदा रद्द करण्यात आला.
विधी
संपादनहिंदू विवाह कायद्याच्या ७ व्या कलमामध्ये विवाहाच्या विधी आणि प्रथांची नोंद घेतली गेली आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहबद्ध होणाऱ्या दोन्हींही व्यक्तींपैंकी एकाच्या समुदायाच्या विधी-परंपरा आणि साजरीकरणाच्या पद्धतींनुसार केला जावा. ह्या विधींमध्ये सप्तपदीसारख्या विधींचा सहभाग होतो. सप्तपदी मध्ये विवाहबद्ध होणाऱ्या दोघांनींही पवित्र अग्निच्या साक्षीने सात पावले एकत्र चालणे अपेक्षीत आहे. विवाहाचा विधी तेव्हाच पूर्ण झाला असे मानले जाते जेव्हा सातवे पाऊल पूर्ण होते.[५]
घटस्फोट
संपादनपती आणि पत्नी यांपैकी कोणीही घटस्फ़ोटासाठी अर्ज करु शकतो, घटस्फ़ोट अनेक कारणांनी घेतला जाऊ शकतो, त्यातील काही मुख्य म्हणजे, व्यभिचार, क्रुरता, दोन किंवा जास्त वर्षांपर्यंत एकमेकांपासून वेगळे रहाणे, जोडीदारांपैंकी एकाचे किंवा दोघांचेही धर्मांतर, मानसिक असामान्यता, दीर्घकालीन आजार आणि कोड असणे ही आहेत. पत्नी घटस्फोटासाठी अर्ज करु शकते जर तिच्या पतीने ह्या लग्नानंतर आणि दोघांत लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दुसरे लग्न केले किंवा पती बलात्कार, समलिंगी संभोगी किंवा प्राणांशी लैंगिक क्रिया करण्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला असेल तर. या व्यतरिक्तही जर जोडीदारांपैंकी कोणालाही जर असे वाटत असेल की विवाह संपवण्याची गरज आहे आणि आता त्यांना विवाहात रहाणे कठीण होत आहे शिवाय जर ते सिद्ध करु शकले तर त्यांना घटस्फ़ोटाकडे जाता येते.[६] विवाहानंतर एक वर्षांपर्यंत घटस्फ़ोटाचा अर्ज करता येत नाही.
- दत्तकविधान आणि निर्वाह कायदा (१०५६)
- Hindu Minority and Guardianship Act (१०५६)
- Hindu Succession Act (१०५६)
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Diwan, Paras (1957/04). "The Hindu Marriage Act, 1955". International & Comparative Law Quarterly (इंग्रजी भाषेत). 6 (2): 263–272. doi:10.1093/iclqaj/6.2.263. ISSN 1471-6895.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Department of Revenue, Rehabilitation and Disaster Management - "Hindu Marriage Act, 1955" Archived 2016-03-04 at the Wayback Machine. d
- ^ V, Jayaram. "Hinduism and Divorce". www.hinduwebsite.com. 2018-09-24 रोजी पाहिले.
- ^ "The Hindu Marriage Act 1955". www.vakilno1.com (इंग्रजी भाषेत). 2019-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-24 रोजी पाहिले.
- ^ "Vaklino.com - "The Hindu Marriage Act, 1955" (Section 7)". 2019-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-02 रोजी पाहिले.
- ^ "Vaklino.com - "The Hindu Marriage Act, 1955" (Section 13)". 2012-04-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-02 रोजी पाहिले.