हिंजवडी
हिंजवडी पुण्यातील पिंपरी चिंचवड जवळील एक उपनगर आहे. राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे विशेष औद्योगिक क्षेत्र हिंजवडीत विकसित करण्यात येत आहे.
पुणे मुंबई महामार्गाच्या जवळ असलेले हे उपनगर राजीव गांधी इन्फोटेक पार्क मुळे झपाट्याने विकसित होत आहे. येथे अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, टेक महिन्द्रा इ. सिंबॉयसिस, आय.आय.आय.टी. सारख्या शैक्षणिक संस्था देखिल येथे कार्यान्वित आहेत.
या उपनगराला अनेकदा हिंजेवाडी या चुकीच्या नावाने संबोधण्यात येते.
इतिहास
संपादनभौगोलिक सीमा
संपादनमहत्त्वाची ठिकाणे
संपादनउद्याने आणि टेकड्या
संपादनप्रार्थना स्थळे
संपादन- ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिर
म्हतोबा मंदिर हिंजवडी
संपादननमस्कार मित्रांनो मी संग्राम अनिल जांभूळकर
श्री म्हातोबा देवाचे मंदिर हे 3 जागी आहे ते कुठे आहे. आपण हे पहिले पाहू सर्वात पहिले मंदिर हे आडगाव बार्पे या जागी आहे. ते हिंजवडी येथून किमान १५०+ किलो मीटर अंतरावर आहे. ते श्री म्हातोबा देवाचे पहिले स्थान आहे. ते स्थान हे जंगलात आहे. ते हिंजवडी तील लोक गेल्या नंतर ते शोधावं लागतं होते. पण ते काही कालांतराने गावातील काही लोकांनी तिथे जाऊन त्या जागेवर ओटा केला उटण्या बसण्यासाठी तेव्हा त्या स्थानावर आता ही खूप लोक जातात. १६३०/१६३५ ह्या सालाच्या दरम्यान देव हिंजवडी मध्ये आले असावेत. तर ते हिंजवडी मध्ये जांभुळकर यांच्या इथे राहिले असावे तेव्हा पासून हिंजवडी गावठाण इथे ते पहिले मंदिर आहे. हिंजवडी मधले आहे. तेव्हाची लोक सांगायचे की जे देव होते ते पूर्ण गावाला वेडा मारायचे आणि प्रत्येकाच्या घरा बाहेर जाऊन काठी वाजवत असे. अजून ही असे आवाज ऐकू येतात. तेव्हा पासून हिंजवडी आयटी पार्क मध्ये हनुमान जयंती ला यत्रा असते.ती यात्रा ८ दिवस असते. त्यात १ला दिवस हा हिंजवडी ते बार्पे पाई प्रस्थान चालू होत.त्यावेळी देवाची खाक ( अंगारा ) सर्वांना दिली जाते व फुकली जाते ते खाक वाले जांभुळकर च आहे.त्यांच्या पुढे पहिली लोक जात नवती. १ पहिल्या रात्र ही असदे गाव आहे तिथे राहून. २ दुसऱ्या दिवशी पहाटे तयार होऊन तिथुन प्रस्थान केले जाते. आणि त्या नंतर तिथे बार्पे गावात जे देव आहे. त्या जागी जंगल भाग आहे. त्या जंगलात जाऊन तिथे शेल ( लाकूड ) निवडलं जात. त्यानंतर तिथे पूजा वगैरे करून ते जंगलातून खाली गावात आणल जात. नंतर तिथले लोक आणि हिंजवडी आणि अनकी बरेचं लोक तेथे जेवण ठेवतात. ते सगळ झाल्या नंतर तिथून प्रस्तान केलं जाते. त्यानंतर परत बरेचं गावे ओलांडून गावा गावा मध्ये अनेक लोक जेवण वगैरे करतात त्या नंतर ते शेल आहे. ते गावा मध्ये आणल जाते. मग दुसऱ्या दिवशी जे चालत शेले आणले जाते त्यांना आराम करण्यासाठी १ दिवस असतो आणि त्यानंतर यात्रा भरते त्या यात्रे मध्ये प्रत्येकाला मान दिला गेलेला आहे.त्या मद्ये पहिला म्हणजे गळकरी यांचा मान हा जांभूळकर यांना दिलेला आहे. दुसरा मान हा खांदेकरी म्हणजे गळकऱ्याच्या दोन्ही बाजूला ते असतात.तीसरा मान हा काठी चा आहे आणि तो मान हा हुलावळे यांना असतो
संस्था
संपादनशिक्षण
संपादनसंस्कृती
संपादनहे सुद्धा पहा
संपादनपरिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |