हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ - ४६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, हिंगणघाट मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुका, सेतू तालुक्यातील सिंदी हे महसूल मंडळ आणि सिंदी नगरपालिका आणि हिंगणघाट तालुक्यातील सावली, वडनेर, पोहाणा, हिंगणघाट ही महसूल मंडळे आणि हिंगणघाट नगरपालिका यांचा समावेश होतो. हिंगणघाट हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय जनता पक्षाचे समीर त्रिंबकराव कुणावर हे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • हिंगणघाट तालुका : सावली, वडनेर, पोहाणा आणि हिंगणघाट महसूल मंडळ; हिंगणघाट नगरपालिका
  • सेतू तालुका : सिंदी महसूल मंडळ; सिंदी नगरपालिका
  • समुद्रपूर तालुका

हिंगणघाट मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ रामकिसनदास मोतीलाल मोहोता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७ केशवराव मोतीराम झडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ विनायक माधव चौधरी अपक्ष
१९७२ केशवराव मोतीराम झडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ देवरावजी झोलबाजी कोल्हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० धनराज लक्ष्मणराव कुंभारे
१९८५ वसंत लक्ष्मण बोंडे भारतीय काँग्रेस (समाजवादी)
१९९० जनता दल
१९९५ अशोक शामराव शिंदे शिवसेना
१९९९
२००४ मोहन वासुदेव तिमांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ अशोक शामराव शिंदे शिवसेना
२०१४ समीर त्रंबकराव कुणावर भारतीय जनता पक्ष
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "इ.स. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी" (PDF) (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१८ रोजी पाहिले.