हरिवंशराय बच्‍चन

भारतीय राजकारणी

हरिवंशराय बच्‍चन (जन्म : बाबूपट्टी-प्रतापगड जिल्हा-उत्तर प्रदेश, २७ नोव्हेंबर, इ.स. १९०७; - मुंबई, १८ जानेवारी २००३) हे हिंदी भाषेतील एक प्रसिद्ध कवी आणि लेखक होते. ते प्रसिद्ध हिंदी सिने-अभिनेते अमिताभ बच्चनचे वडील होते. यांचे जन्म प्रतापगढ जिल्ह्याचे हा गावात झाला होता.[] त्यांचे एम.ए.पर्यंतचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली, व ते अलाहाबाद विश्वविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. निवृत्तीनंतर ते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात हिंदी विशेषज्ञ म्हणून नोकरी केली. ते राज्यसभेच्या १२ नामनिर्देशित सदस्यांपैकी एक होते.

हरिवंशराय बच्‍चन

हरिवंशराय बच्‍चन हे हिंदी कवितेतील उत्तर छायावादी काळातले प्रमुख कवी होते.

त्यांनी अमिताभ यांना मन का होतो अच्छा मन काना होतो जादा अछ्छा हे सांगितले. त्यांची मधुशाला नावाची दीर्घ कविता प्रसिद्ध आहे. "मंदिर मस्जित बैर कराते मेल कराती मधुशाला" अशी एक काव्यपंक्ती यामध्ये आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ Harivanshrai Bachchan, 1907-2003 Archived 2010-08-22 at the Wayback Machine. Obituary, Frontline, (द हिंदू), February 01–14, 2003.