हरि वामन लिमये

(हरिभाऊ लिमये या पानावरून पुनर्निर्देशित)

हरि वामन लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये (जन्म : पुणे, २६ एप्रिल, इ.स. १९२७; - - पुणे, जानेवारी १, २०१७) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यचळवळीत योगदान देणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील भागीदार आणि मसाजतज्ज्ञ होते. समाजवादी चळवळीचा संस्कार, महात्मा गांधी, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, साने गुरुजी यांचा त्यांचावर प्रभाव होता.

हरि वामन लिमये

स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ लिमये
जन्म: एप्रिल २६, इ.स. १९२७
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: जानेवारी १, इ.स. २०१७
पुणे, महाराष्ट्र, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: राष्ट्र सेवा दल
धर्म: हिंदू
प्रभाव: समाजवादी तत्वप्रणाली
वडील: वामन लक्ष्मण लिमये
आई: सरस्वती वामन लिमये
पत्नी: निर्मला
अपत्ये: अतुल, अजिता


चरित्र

संपादन

वामन लक्ष्मण लिमये व सरस्वती वामन लिमये यांच्या ३ मुले आणि ५ मुली अशा एकूण ८ अपत्यांपैकी हरिभाऊ हे ५वे अपत्य होय. अवघ्या १६ वर्षांच्या वयात ब्रिटिशांच्या दडपशाहीला विरोध करण्यासाठी हरिभाऊ व त्यांच्याहून वयाने थोड्या मोठय़ा तरुणांनी पुणे शहरातल्या छावणी परिसरातील कॅपिटॉल, एम्पायर, वेस्टएन्ड या चित्रपटगृहांत बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ४ ब्रिटिश अधिकारी व कर्मचारी मारले गेले. पोलिसी हिसका दाखवूनही सहकारी पकडले जातील म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची नावे गुप्त ठेवली. त्यांच्यावर भरलेल्या खटल्यात त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेऊन वकिली करण्यास प्रारंभ केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते आघाडीवर होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतावर लादलेल्या आणीबाणीदरम्यान तुरुंगात डांबलेल्या कार्यकर्त्यांचे विनामोबदला वकीलपत्र घेऊन त्यांनी अनेकांची सुटका केली.[] गोवा मुक्तिसंग्रामातही त्यांचा सहभाग होता.|

मसाजिस्ट हरिभाऊ

संपादन

हरिभाऊ लिमये यांचे आजोबा लक्ष्मण लिमये यांनी त्यांच्या काळात भारतीय उपचार पद्धतीमधील मोफत मसाज केंद्र पुणे शहरातील त्यांच्या घरीच सुरू केले होते. त्यांच्यानंतर हा वारसा त्यांचे ज्येष्ठ पुत्र वामन ऊर्फ महाराज लिमये यांनी सुरू ठेवला. महाराज लिमये यांचे हरिभाऊ धाकटे चिरंजीव. श्रीकृष्ण लिमये आणि पुण्याचे माजी महापौर निळूभाऊ लिमये हे हरिभाऊंचे ज्येष्ठ बंधू होत.

पुण्यातील या महाराज लिमये मसाज केंद्राद्वारे लिमये कुटुंबीयांनी हजारो रुग्णांची तुटलेली हाडे मोफत सांधून दिली.

साहित्य

संपादन
  • अच्युतराव पटवर्धन
  • अमृतपुत्र - साने गुरुजी - १९९८
  • आम्ही जातो आमुच्या गावा - २००२
  • कारागृहातील पथिक - १९८७
  • चंद्रभागेच्या वाळवंटीं - १९८१
  • दारूबंदीची नशा - १९६७
  • मृत्युदंड - एक फेरविचार - १९९९
  • डॉ. राम मनोहर लोहिया - बॅटल फॉर लिबर्टी अँड जस्टिस ( इग्रजी) - २००१
  • साने गुरुजी : आठवणीतील - १९९६
  • हिमालयाची शिखरे - १९८९
  • द हीलिंग टच (इंग्रजी)

प्रकाशनाचे काम

संपादन

सामाजिक कार्य

संपादन

चळवळी आणि कार्यकर्त्यांचे ते आधारवड होते. त्यांनी आपली बुद्धी, धन व जागा देऊन कार्यकर्त्यांना मुक्तहस्ते मदत केली. वंचितांसाठी काम करणाऱ्या संस्थांना ते ठराविक तारखेला न चुकता देणगीचा धनादेश पाठवत.

संदर्भ आणि नोंदी

संपादन