अच्युतराव पटवर्धन
अच्युतराव पटवर्धन (फेब्रुवारी ५, इ.स. १९०५ - ऑगस्ट ५, इ.स. १९९२) हे स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत पद्धतीने काम करणारे नेते होते.
अच्युतराव सीताराम पटवर्धन | |
---|---|
अच्युतराव पटवर्धन, शांतीकुंज, चेन्नईयेथे | |
जन्म: | फेब्रुवारी ५, इ.स. १९०५ |
मृत्यू: | ऑगस्ट ५, इ.स. १९९२ |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
शिक्षण: | एम.ए.(अर्थशास्त्र) |
संघटना: | भारतीय समाजवादी पक्ष |
प्रभाव: | समाजवाद |
वडील: | हरी केशव पटवर्धन |
चरित्र
संपादननगरचे प्रतिथयश वकील हरी केशव पटवर्धन यांच्या सहा मुलांपैकी दुसरे अपत्य असलेले अच्युतराव आपले काका सीताराम पटवर्धन यांना दत्तक गेले होते. अच्युतरावांचे प्राथमिक शिक्षण नगर मध्ये झाले होते तसेच ते काशी विश्वविद्यालयाचे अर्थशास्त्राचे द्विपदवीधर होते. पश्चिम महाराष्ट्रातील (विशेषतः नगर जिल्ह्यातील) स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व त्यांनी व त्यांचे थोरले बंधू रावसाहेब पटवर्धन यांनी केले.[१] १९४२ नंतर अनेक वर्षे दक्षिण महाराष्ट्रात भूमिगत राहून यशस्विपणे चळवळीचे कार्य करणारे अच्युतराव इंग्रजांच्या हाती कधीच लागले नाहीत.[२]
अच्युतराव व त्यांचे साथीदार आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण प्रभुतींनी १९३४ साली समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती पण तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा उपपक्ष असल्याने तेथे समाजवादाला काही थारा मिळणार नाही हे उमगल्याने त्यांनी १९४७ साली भारतीय समाजवादी पक्ष स्थापन केला.[३]
समाज कार्य
संपादन- राजघाट रुरल सेंटर[४]
साहित्य, पत्रकारिता व अन्य लेखन
संपादन- डिसइल्यूजनमेंट अँड क्लॅरिटी (इंग्लिश) (Disillusionment & Clarity)
- आयडिऑलॉजीज अँड द पर्स्पेक्टिव्ह ऑफ सोशल चेंज इन इंडिया (इंग्लिश) (Ideologies and the perspective of social change in India) (मुंबई विद्यापीठ, १९७१)
- द कम्यूनल ट्रॅंगल ऑफ इंडिया (इंग्लिश) (The communal triangle in India) (अशोक मेहता आणि पटवर्धन, १९४२)
संदर्भ
संपादन- ^ "अहमदनगरातील विशेष व्यक्ती". 2011-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-13 रोजी पाहिले.
- ^ अहमदनगरचा इतिहास
- ^ वंदेमातरम् डॉट कॉम
- ^ http://data.ashanet.org/datastore/data/Chapters/Princeton/minutes/minutes05062000.txt[permanent dead link]