विनायक हरी ऊर्फ हरिभाऊ पाटसकर (इ.स. १८९२:इंदापूर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, २१ फेब्रुवारी, इ.स. १९७०:पुणे, महाराष्ट्र) हे मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.

शिक्षण आणि व्यवसाय

संपादन

बी.ए. एल्‌एल.बी, एल्‌एल.डी. झालेले पाटसकर मुंबई उच्च न्यायालयात आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात ते वकिली करत. त्या काळात त्यांनी अनेकांना कायद्याचा मोफत सल्ला दिला. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या मानसन्मानासाठी पाटसकरांनी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी वितुष्ट पत्करले होते.

कारकीर्द

संपादन
 • इ.स. १९२०पासून भारतातील काँग्रेस या पक्षाचे सभासद
 • १९२६ साली ते मुंबई विधिमंडळाचे नामदार झाले.
 • १९३७ ते १९३९ आणि १९४५ ते १९५२ या कालावधीसाठी ते मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळात आमदार होते.
 • १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीदरम्यान सत्याग्रह गेल्यामुळे तुरुंगवास
 • १९४७-५० : घटनासमितीचे सदस्य
 • १९५२ : भारताच्या पहिल्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले.
 • १९५५-५७ : भारत सरकारात आधी कायदेमंत्री आणि नंतर नागरी उड्डाणमंत्री
 • १९६७-१९७० : पुणे विद्यापीठाचे कुलगुरू
 • महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची उकल करण्यासाठी नेमलेल्या चार सभासदांच्या समितीवर काम. त्यांनी तयार केलेल्या अहवालाला पाटसकर अहवाल म्हणतात. हा अहवाल नेहरू सरकारने झिडकारला.)
 • निवृत्तीपश्चात : आसाम पर्वतीय सीमा कमिशनवे सभापती
 • मध्यप्रदेश राज्याचे प्रदीर्घ कालापर्यंत राज्यपाल ( १४-६-५७ ते १०-२-१९६५, ७ वर्षे ७ महिने)
 • गुन्हेगाराला न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेनंतर त्याने केलेल्या दयायाचना काळजीपूर्वक वाचून, त्यांवर स्वहस्ते सूचना लिहीत.

पुरस्कार

संपादन