हरभट पटवर्धन हे पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष होते.

हरभट पटवर्धन ह्यांचे मूळ गाव कोतवडे ह्या कोकणातील ठिकाणी होते. गणपतीपुळ्याच्या गणेशाचे ते निस्स्मीम भक्त होते. घराण्याच्या उत्कर्षासाठी कोकणातून् प्रवास करताना त्यांची गाठ इचलकरंजीला पेशवेकालिन सरदार घोरपडे ह्यांच्याशी पडली. त्यांच्या शिफारशीवरून् हरभटांची मुले पेशव्यांच्या सेवेत रुजू झाली. [१]

ह्याच घराण्यात पुढे गृहकलह निर्माण होऊन जमखंडी संस्थान, मिरज संस्थान (थोरली पाती), मिरज संस्थान (धाकटी पाती), सांगली संस्थान, तासगाव संस्थान अशी छोटी संस्थाने निर्माण झाली.

सांगलीच्या हरभट रोड ह्या रस्त्याचे नाव ह्यांच्या नावावरूनच पडले आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ "तासगावाचा ऐतिहासिक रथोत्‍सव". पुढारी. Archived from the original on 2020-02-22. 2020-10-07 रोजी पाहिले.

हेसुद्धा पहा संपादन