गोविंद हरी पटवर्धन हे पेशवेकालिन सरदार होते.

पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरी पटवर्धन ह्यांच्या ६ अपत्यांपैकी गोविंदराव हे एक होते. पेशव्यांनी श्रीरंगपट्टणम् येथे हैदर अलीविरुद्ध केलेल्या स्वारीत गोविंदरावांनी मोठा पराक्रम गाजवला. त्याबद्दल थोरल्या माधवराव पेशव्यांनी त्यांना इ.स. १७६१ मध्ये मिरजेची जहागिर बहाल केली.[] मराठा साम्राज्याची सीमा तुंगभद्रेपर्यंत वाढवण्यात गोविंदरावांनी केलेल्या पराक्रमाचा मोलाचा वाटा होता.


संदर्भ

संपादन
  1. ^ "मिरज संस्थान". लोकसत्ता.