हरनाज कौर संधू (जन्म ३मार्च २०००) ही एक भारतीय मॉडेल असून इ.स. २०२१ च्या विश्व सुंदरी पुरस्काराची मानकरी आहे. संधूने याआधी मिस दिवा युनिव्हर्स २०२१ची स्पर्धा देखील जिंकलेली आहे. विश्व सुंदरी स्पर्धा जिंकणारी ती भारतातील तिसरी स्पर्धक आहे.[]

हरनाज संधू
जन्म हरनाज संधू
३ मार्च, २००० (2000-03-03) (वय: २४)
गुरूदासपूर, पंजाब , भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री मॉडेल
ख्याती

 •  फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९,
 •  मिस दिवा युनिव्हर्स २०२१,

 •  मिस युनिव्हर्स २०२१
पुरस्कार

 •  मिस दिवा युनिव्हर्स २०२१,

 •  मिस युनिव्हर्स २०२१

संधूने २०१९ मधील 'फेमिना मिस इंडिया पंजाब' स्पर्धेतील विजेती ठरली होती. तसेच फेमिना मिस इंडिया २०१९ मध्ये उपविजेता म्हणून स्थान पटकावले होते.[]

प्रारंभिक जीवन

संपादन

हरनाज कौर संधूचा जन्म पंजाब मधील गुरदासपूर जिल्ह्यातील कोहली या गावी इस २००० मध्ये एका जाट शीख कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचे नाव प्रितमपाल सिंग संधू आणि रबिंदर कौर संधू आहे. तिच्या वडिलांचा व्यवसाय स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री करण्याचा असून आई स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. संधूला हरनूर नावाचा मोठा भाऊ देखील आहे.[]

इस. २००६ मध्ये हे कुटुंब इंग्लंडला गेले होते परंतु अवघ्या दोन वर्षात ते भारतात परत आले आणि चंदीगढमध्ये स्थायिक झाले. संधुने चंदिगढ येथील शिवालिक पब्लिक स्कूल मधून आपले शालेय शिक्षण आणि गव्हर्नमेंट कॉलेज फॉर गर्ल्स मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मिस युनिव्हर्स होण्यापूर्वी संधू सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेत होती.[][]

स्पर्धा

संपादन

संधूने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली होती. तिने सुरुवातीला मिस चंदीगढ २०१७ आणि मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ सारखी विजेतेपदे जिंकली.[] सुरुवातीला, संधूने तिच्या पहिल्या स्पर्धेसाठी नोंदणी केली तेव्हा तिच्या वडिलांना याबद्दल सांगितले नाही. स्पर्धा जिंकल्यानंतर जेव्हा तिने आपल्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा त्यांना चांगलाच आनंद झाला. फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९ चे विजेतेपद पटकावल्यानंतर, संधूने फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला, जिथे तिने शेवटी टॉप १२ मध्ये स्थान मिळवले.[][]

मिस दिवा २०२१

संपादन

१६ ऑगस्ट २०२१ रोजी, संधूला मिस दिवा २०२१ च्या टॉप ५० सेमीफायनलपैकी एक म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी, दूरचित्रवाणी मिस दिवा स्पर्धेत भाग घेणाऱ्या टॉप २० फायनलिस्टपैकी एक म्हणून तिची पुष्टी झाली. २२ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या प्राथमिक स्पर्धेदरम्यान, संधूने मिस ब्युटीफुल स्किन पुरस्कार जिंकला आणि मिस बीच बॉडी, मिस ब्युटीफुल स्माइल, मिस फोटोजेनिक आणि मिस टॅलेंटेडसाठी अंतिम फेरीत सहभागी झाले.[][]

ग्रँड फिनालेदरम्यान मिस दिवा २०२१ स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेरीत संधूने टॉप १० सेमीफायनलमधील एक स्पर्धक म्हणून आपले मत पुढील प्रमाणे नोंदवले:

एक दुबळी मानसिक अवस्था असलेल्या एका तरुण मुलीपासून, जिने गुंडगिरीचा आणि लज्जास्पद शारीरिक छेडछाडीचा सामना केला तिच्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून देणाऱ्या एका फिनिक्सप्रमाणे उदयास आलेल्या स्त्रीपासून. एकेकाळी स्वत:च्या क्षमतेवर शंका घेणाऱ्या व्यक्तीपासून तरुणांना प्रेरणा देण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या स्त्रीपर्यंत. आज, मी एक धाडसी, उत्साही आणि दयाळू स्त्री म्हणून विश्वासमोर अभिमानाने उभी आहे जी एका विशिष्ट उद्देशाने जीवन जगण्यासाठी आणि एक उल्लेखनीय वारसा मागे ठेवण्यासाठी सज्ज आहे.

[][१०]

स्पर्धेच्या पुढील फेरीत तिची निवड झाली. अंतिम प्रश्नोत्तर फेरीदरम्यान, पहिल्या ५ स्पर्धकांना बोलण्यासाठी वेगवेगळे विषय देण्यात आले, जे स्पर्धकांनी स्वतः ड्रॉद्वारे निवडले. संधू यांनी "ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज" निवडले होते, ज्यात तिने सांगितले:

एक दिवस जेव्हा आयुष्याचा प्रवास तुमच्या डोळ्यांसमोर येईल, तेव्हा ते पाहण्यालायक असेल याची खात्री करा. तथापि, हे असे जीवन नाही जे तुम्हाला पहायचे आहे, जिथे हवामान बदलत आहे आणि पर्यावरण मरत आहे. ही आम्हा मानवांनी निसर्गाच केलेली एक फसवणूक आहे जी

. मला विश्वास आहे की आपल्या बेजबाबदार वर्तनाला पूर्ववत करण्यासाठी आपल्याकडे अद्याप वेळ आहे. पृथ्वी ही आपल्या सर्वांच्या मध्ये सामाईक आहे आणि एक व्यक्ती म्हणून आपली छोटी कृती कोट्यवधींनी एकवटल्यास संपूर्ण जग बदलू शकते. आत्ताच प्रारंभ करा, आज रात्रीपासूनच, स्विच ऑफ करा ते अतिरिक्त दिवे जे वापरात नाहीत. धन्यवाद.

[११]

इव्हेंटच्या शेवटी, संधूला विजेते म्हणून गतवर्षीच्या विजेत्या 'ॲडलाइन कॅस्टेलिनोने' मुकूट दिला.[११]

मिस युनिव्हर्स २०२१

संपादन

मिस दिवा २०२१ म्हणून, संधूला मिस युनिव्हर्स 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार मिळाला. ही स्पर्धा इस्रायल मधील ऐलात शहरात १२ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आली.[१२][१३] संधूने सुरुवातीच्या ८० स्पर्धकांच्या गटातून अव्वल सोळामध्ये प्रवेश केला, नंतर ती विजेता म्हणून ताज मिळवण्याआधी टॉप टेन, टॉप फाइव्ह आणि टॉप तीनमध्ये पोहोचली. तिच्या विजयानंतर, ती मिस युनिव्हर्सचा ताज जिंकणारी तिसरी भारतीय महिला ठरली.[१४][१५] Following her win, she became the third Indian woman to be crowned Miss Universe.[१६][१७][१८]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b c "Once a small-town girl, Miss Universe Harnaaz Sandhu capturing hearts across globe". हिंदुस्तान टाइम्स. 14 December 2021.
  2. ^ "मिस यूनिवर्स के लिए ऐसे तैयारी कर रही हैं हरनाज संधू, तीनों ही स्टार्स ने खोले जिंदगी के राज". Times Now (Hindi भाषेत). 11 October 2021.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Who is Harnaaz Sandhu? The Miss Universe 2021 from India". Hindustan Times. 13 December 2021.
  4. ^ "Harnaaz Sandhu: Everything About the Winner of LIVA Miss Diva Universe 2021". thetealmango.com.
  5. ^ "Crowning the winners of Miss India North 2019". timesofindia.indiatimes.com.
  6. ^ "Miss India 2019 Contestants". beautypageants.indiatimes.com. 2023-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-14 रोजी पाहिले.
  7. ^ "Unveiling of LIVA Miss Diva 2021 Top 50 Contestants!". beautypageants.indiatimes.com. 2021-12-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-14 रोजी पाहिले.
  8. ^ "Presenting the winners of LIVA Miss Diva 2021 sub-contest". beautypageants.indiatimes.com. 2021-12-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-14 रोजी पाहिले.
  9. ^ "'Want to make India proud at Miss Universe 2021': Harnaaz Sandhu". The Indian Express. 11 October 2021.
  10. ^ "Chandigarh's Harnaaz Sandhu crowned winner of LIVA Miss Diva Universe 2021". The Tribunal. 1 October 2021. 8 December 2021 रोजी पाहिले.
  11. ^ a b "Chandigarh's Harnaaz Sandhu crowned LIVA Miss Diva Universe 2021". beautypageants.indiatimes.com. 2021-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-14 रोजी पाहिले.
  12. ^ "Harnaaz Sandhu Is Miss Universe India 2021, Ritika Khatnani Wins Miss Diva Supranational 2022 Title". latestly.com.
  13. ^ "Miss Universe 2021 to be held in Israel, Steve Harvey to return as host". USA Today. 20 July 2021. 20 July 2021 रोजी पाहिले.
  14. ^ "LIVE UPDATES: 70th Miss Universe coronation". CNN Philippines. 2021-12-13. 2021-12-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-13 रोजी पाहिले.
  15. ^ "India's Harnaaz Sandhu is crowned Miss Universe 2021". CNN. 12 December 2021.
  16. ^ "India's Harnaaz Sandhu wins Miss Universe 2021". Philippine Star. 13 December 2021.
  17. ^ "Harnaaz Sandhu of India named 70th Miss Universe". San Francisco Chronicle. 12 December 2021. 2021-12-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-14 रोजी पाहिले.
  18. ^ "India's Harnaaz Sandhu Brings Home Miss Universe Crown After 21 Years". NDTV.com. 13 December 2021 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन