हरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

हरगड
नाव हरगड
उंची
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी
ठिकाण नाशिक, महाराष्ट्र
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


इतिहास

संपादन

इतिहासात फारसा या गडाचा उल्लेख नाही कारण येथे कोणती मोठी लढाई झाली नाही. मुल्हेर गावात गेल्यावर हरगडचे दर्शन होते. समोर दिसणारा मुल्हेर,डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड. या गडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त म्हणजे १३५७ मीटर इतकी आहे.

हरगडाची निर्मिती बागुल वंशीय(राठोड घराणं) यांनी केली . बागुल वंशीय घराण्याच्या नावामुळेच हा भूप्रदेश बागलाण म्हणून ओळखला जातो . यांच्या राजवटीचा कालावधी सन १३०८ ते १६३८ मानण्यात येईल .मुल्हेरसारख्या राजधानियुक्त किल्याची संरक्षणाची जबाबदारी हरगड वर होती. १५ फेब्रुवारी १६३८ रोजी बागलाणचे वैभव मोगलांच्या ताब्यात गेले.सन १६७२ सुमारास मोरोपंत व प्रतापराव यांनी हरगड स्वराज्यात आणला.१५ जुलै १८१८ मध्ये हरगडचा ताबा इंग्रजांकडे गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

संपादन

गडमाथा तसा विस्तीर्ण आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. या पठारावर काही तटबंदीचे अवशेष आहेत. पाण्याची दोन टाकी आहेत. एक पडके मंदिर आहे. वाड्यांचे काही अवशेष आढळतात. पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पिण्यासारखे नाही. गडफेरी मारताना पुढे सपाटीवर एक गुहा आढळते यात कपार भवानीचे मंदिर आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

संपादन

गडावर जाणारी वाट मुल्हेर गावातून जाते. मुल्हेर गावातून पुढे आल्यावर एक डांबरी रस्ता लागतो. या रस्त्याने वीस मिनिटे पुढे गेल्यावर दोन फाटे फुटतात. एक डावीकडे जातो, तर दुसरा वडाच्या झाडापासून पुढे जातो. ही वाट छोटाश्या टेकडीवर असणाऱ्या धनगर वाडीपाशी पोहोचते. येथून उजवीकडे वळावे आणि थेट मुल्हेर व हरगड यांमधील खिंड गाठावी. येथपर्यंत पोहचण्यास दीड तास पुरतो. खिंडीत डावीकडे जाणारी वाट आपल्याला मुल्हेरगडाकडे तर उजवीकडे जाणारी वाट हरगडाकडे घेऊन जाते. वाट फारशी मळलेली नसल्यामुळे अस्पष्ट झालेली आहे. या खिंडीपासून गडमाथा गाठण्यास एक तास लागतो.

बाह्य दुवे

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन