डॉ स्वरूप रावल (पूर्वाश्रमीच्या स्वरूप संपत), (३ नोव्हेंबर १९५८) ह्या एक भारतीय अभिनेत्री आहेत. त्या ८० च्या दशकातील 'नरम गरम' आणि 'नाखुदा' सारख्या हिंदी चित्रपटांमधील भूमिका तसेच 'ये जो है जिंदगी' सारख्या दूरचित्रवाणी मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जातात.[] त्यांनी इस १९७९ मधील 'भारत सुंदरी' (मिस इंडिया)चा पुरस्कार जिंकला होता. तसेच त्याच साली विश्व सुंदरी (मिस युनिव्हर्स) स्पर्धेत मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व देखील केले होते.[][]

स्वरूप संपत रावळ
स्वरूप संपत (२०१४)
जन्म स्वरूप परेश रावळ
३ नोव्हेंबर, १९५८ (1958-11-03) (वय: ६६)
गुजरात
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय , मॉडेलिंग , चित्रपट निर्माता
कारकीर्दीचा काळ १९८० ते आजतागायत
भाषा गुजराती
प्रमुख टीव्ही कार्यक्रम ये जो है जिंदगी
पुरस्कार फेमिना मिस इंडिया - १९७९
पती []
अपत्ये अनिरुद्ध, आदित्य
धर्म हिंदू

वैयक्तिक आयुष्य

संपादन

स्वरूप संपत ने अभिनेता परेश रावळसोबत इ.स. १९८७ साली लग्न केले.[] ती तिच्या पती अभिनीत नाटकांचे दिग्दर्शन आणि अभिनय करते. त्यांना अनिरुद्ध आणि आदित्य अशी दोन मुले आहेत

 
परेश रावल आणि स्वरूप संपत 'ओये लकी! लकी ओये!' चित्रपटाच्या वेळी

स्वरूप संपत यांनी वूस्टर विद्यापीठ येथून पीएचडी मिळवली आहे.[][] नाटकाचा वापर करून अपंगत्व असलेल्या मुलांचे जीवन कौशल्य कसे वाढवता येईल यावर प्रबंध सादर केला (डॉक्टरेट).[]

अभिनयाची कारकीर्द

संपादन

स्वरूप संपत यांनी ८० च्या दशकातील दूरदर्शन वरील प्रचंड लोकप्रिय मालिका 'ये जो है जिंदगी' मध्ये मुख्य भूमिका साकारली. यात त्यांनी शफी इनामदारच्या रेणू नावाच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यांना ये जो है जिंदगीची स्क्रिप्ट खूपच हृदयस्पर्शी वाटली होती आणि त्यांची अशी खात्री होती की ही भूमिका सामान्य लोकांशी चांगली जोडलेली आहे आणि त्यांच्या दैनंदिन क्रियाकलाप आणि साधेपणाने जीवन जगते. आणि केवळ यासाठी त्यांनी दूरदर्शन वरील दुसरी एक महत्त्वाची मालिका नाकारली होती. आज त्यांना हा निर्णय घेतल्याचे सार्थक वाटते. त्यावेळी कमल हासन - रीना रॉय यांच्या भूमिका असलेला चित्रपट 'करिश्मा' मध्ये देखील दिसल्या होत्या.

संपत यांनी 'शिंगार' या कुमकुम कंपनीसाठी मॉडेलिंग केले होते.

त्या आजच्या काळात अपंग मुलांना अभिनय शिकवतात. तसेच आपल्या प्रबंध शोधाचा सदुपयोग करून घेण्यासाठी त्या भारतभर प्रवास करतात आणि शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करतात.[]

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी संपत यांची निवड केली होती.[]

जगभरातील १७९ देशांतील १०,००० नामांकनांमध्ये, वार्की फाउंडेशनने आयोजित केलेल्या ग्लोबल टीचर बक्षीससाठी तिला टॉप-१० ग्लोबल फायनलिस्टमध्ये निवडण्यात आले होते.[]

अभिनय सूची

संपादन

दूरचित्रवाहिनी

संपादन
वर्ष मालिका भूमिका
1984 ये जो है जिंदगी रेणू
1990 ये दुनियां गजब की
1990 ऑल द बेस्ट
1990 बीवी तो बिवी साला रे साला लक्ष्मी
1990 शांती

चित्रपट

संपादन
वर्ष चित्रपट भूमिका
2021 द व्हाईट टायगर समाजसेविका
2019 उरी: सर्जिकल स्ट्राइक सुहाशिनी शेरगिल
2016 की अँड का कि आची आई
2013 सप्तपदी स्वाती संघवी
2002 साथिया शांती
1986 कर्मदाता नीता
1985 जान की बाज़ी
1985 बहु की आवाज कविता
1984 करिश्मा सपना
1984 लोरी सुमन
1983 हिम्मतवाला पद्मा
1982 तुम्हारे बिना सीमा दत्त
1982 सवाल रेशमी सिंग
1981 नाखुदा सोनिया गुप्ता
1981 नरम गरम कुसुम

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Members : Loksabha" (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Swaroop Sampat". IMDb.
  3. ^ "1980-1971 - Beauty Pageants - Indiatimes". Femina Miss India. 2023-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-28 रोजी पाहिले.
  4. ^ "The right recipe". The Hindu. 14 April 2007. 29 May 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "Archived copy". 2007-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-11-03 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  6. ^ "Swaroop Sampat-Profile". indiatimes.com. 2015-04-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 April 2015 रोजी पाहिले.
  7. ^ a b "Teaching life skills is now her role | Ahmedabad News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया.
  8. ^ "Archived copy". 2009-11-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-11-03 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  9. ^ "મુકેશ અંબાણીથી ઓછી સંપતિ નથી પરેશ રાવલની પત્ની હિરોઈને પણ ટક્કર આપે છે… | Rahasya" (इंग्रजी भाषेत). 2021-05-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-25 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन