सोमदेव देववर्मन ( १६ फेब्रुवारी १९८५) हा एक भारतीय टेनिसपटू आहे. भारताच्या त्रिपूरा राज्यामध्ये मूळ असलेल्या व गुवाहाटीमध्ये जन्मलेल्या देववर्मनने २००२ साली अमेरिकेच्या व्हर्जिनिया विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी व टेनिस प्रशिक्षणासाठी स्थानांतर केले. अमेरिकेच्या आंतर-विद्यापीठ टेनिस स्पर्धांमध्ये सलग तीन वेळा अंतिम फेरी गाठणारा व दोनदा जिंकणारा देववर्मन हा पहिलाच खेळाडू आहे.

सोमदेव देववर्मन
२०१३ फ्रेंच ओपन दरम्यान देववर्मन
देश भारत ध्वज भारत
वास्तव्य व्हर्जिनिया, अमेरिका
जन्म १६ फेब्रुवारी, १९८५ (1985-02-16) (वय: ३९)
गुवाहाटी, आसाम
उंची १.८० मी (५ फु ११ इं)
सुरुवात २००८
शैली उजवा; एकहाती बॅकहॅन्ड
बक्षिस मिळकत ११,०६,५८१ डॉलर्स
एकेरी
प्रदर्शन 62–81
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ६२ (२५ जुलै २०११)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ९८ (१३ जानेवारी २०१४)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन २ फेरी (२०१३)
फ्रेंच ओपन २ फेरी (२०१३)
विंबल्डन २ फेरी (२०११)
यू.एस. ओपन २ फेरी (२००९, २०१३)
दुहेरी
प्रदर्शन 19–26
शेवटचा बदल: जाने २०१४.


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
राष्ट्रकुल खेळ
सुवर्ण २०१० दिल्ली पुरुष एकेरी
आशियाई खेळ
सुवर्ण २०१० क्वांगचौ पुरुष एकेरी
सुवर्ण २०१० क्वांगचौ पुरुष दुहेरी
कांस्य २०१० क्वांगचौ पुरुष संघ

२००८ सालापासून देववर्मन व्यावसायिक टेनिस स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहे. २००९ सालच्या चेन्नई ओपन स्पर्धेचे उपविजेतेपद ही त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०११ साली देववर्मनला भारत सरकारतर्फे अर्जुन पुरस्कार देण्यात आला.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Somdev Devvarman receives Arjuna Award". 14 December 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन