सोफिया गार्डन्स (क्रिकेट मैदान)

(सोफिया गार्डन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

सोफिया गार्डन्स वेल्समधील कार्डिफ येथे असलेले खेळाचे मैदान आहे. हे मैदान प्रायोजक बदल्याच्या कारणाने २०१५ पासून, द एस‌एस‌ई एस‌डब्ल्यूएएल‌ईसी म्हणून ओळखले जाते. ग्लॅमॉर्गन काउंटी क्रिकेट क्लबचे हे घरचे मैदान असून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट स्थळांमध्ये याची गणना होते.

सोफिया गार्डन्स
द रियली वेल्श पॅव्हिलियन
मैदान माहिती
स्थान कार्डिफ, वेल्स
आसनक्षमता १५,६४३
मालक कार्डिफ नगर परिषद

प्रथम क.सा. ८-१२ जुलै २००९:
इंग्लंड  वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम क.सा. ८-११ जुलै २०१५:
इंग्लंड  वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम ए.सा. २० मे १९९९:
ऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलंड
अंतिम ए.सा. २७ ऑगस्ट २०१४:
इंग्लंड वि. भारत
प्रथम २०-२० ५ सप्टेंबर २०१०:
इंग्लंड वि. पाकिस्तान
अंतिम २०-२० ३१ ऑगस्ट २०१५:
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया
यजमान संघ माहिती
ग्लॅमॉर्गन (१९६७ - सद्य)
शेवटचा बदल १ जुलै २०१६
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

काउंटी क्रिकेट

संपादन
द कॅथेड्रल रोड एंड
पुनर्विकासापूर्वी
पुनर्विकासानंतर

सदर मैदान हे ग्लॅमॉर्गन काउंटी क्रिकेट क्लबचे घरचे मैदान असून, कार्डिफ आर्म्स पार्कमधून बाहेर पडल्यानंतर ते २४ मे १९६७ पासूनचे त्यांचे घरचे सामने ह्या मैदानावर खेळले आहेत, []. कार्डिफ ॲथलेटिक क्लब हे ह्या मैदानाचे याआधीचे भाडेकरू होते, त्याचा क्रिकेट विभाग कार्डिफ क्रिकेट क्लबला व्हाईटचर्च येथे हलवल्यानंतर १९९५ मध्ये हे मैदान १२५-वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेण्यात आले. क्रिकेट मैदानाशिवाय येथे स्पोर्ट्स वेल्स राष्ट्रीय केंद्राचे मोठे क्रीडा संकुलसुद्धा आहे. या जागेचा उपयोग पुर्वी कार्डिफ कोरिन्थियन्स फुटबॉल क्लब करीत असे. जुलै २००७ मध्ये ग्लॅमॉर्गन क्रिकेट खेळाडू माईक पॉवेलच्या इच्छेनुसार त्याच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान काढलेली त्याची बरगडी ह्या मैदानात पुरली गेली.[]

मैदान पुनर्विकास

संपादन

मैदानाच्या नावाचे अधिकार

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन