सोनाळा हे महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेले गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या १२,८९२ असून त्यातील ६,७४९ पुरुष असून ६,१४३ महिला आहेत. या गावातील साक्षरता प्रमाण ८१.१०% असून ते महाराष्ट्राच्या साक्षरता प्रमाणपेक्षा (८५.१८) कमी आहे. सोनाळा गावाचे ग्रादैवत संत सोनाजी महाराज आहेत. दिवाळी नंतर कार्तिक पौर्णिमेला संत सोनाजी महाराजांची मोठी यात्रा भरते,त्या मध्ये महत्त्वाचे पूर्वी पासून चालत आलेली “रथोत्सव” परंपरा आहे. तिथं रात्री 12ला रथाची पूजा केली जाते, नंतर संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येते संपूर्ण गावकरी मंडळी सहकार्य करतात. दुसऱ्या दिवशी दुपारी 12ला दहीहंडी मोठ्या थाटामाटात संपन्न होते नंतर अनेक गावामधून आलेल्या लोकांना मोठा भंडारा म्हणजे जेवणाचे नियोजन केलेले असते तिथं संपूर्ण दिवस राणा ग्रुप चे मुल संपूर्ण गावकरी सहकार्य करत असतात.

ग्रामदैवत संपादन

 
संत सोनाजी महाराज यांच्या पुतळ्याचे चित्र

संत सोनाजी महाराज हे सोनाळा या गावचे ग्रामदेवत आहे. मुळात बावनवीर येथे जन्मलेले सोनाजी महाराज आपल्या मामाच्या गावाला म्हणजे बुलढाणा जवळच्या (सोनाळा)ला मामाजवळ रहायला आले होते.