सोनम वांगचुक
सोनम वांगचूक (१ सप्टेंबर, १९६६ - ) हे लडाखमधील मध्ये एक अभियंता आणि शिक्षण सुधारक आहेत.
सोनम वांगचुक | |
---|---|
जन्म |
१ सप्टेंबर १९६६ उलेतोकोपो ,जम्मू काश्मीर |
निवासस्थान | जम्मू काश्मीर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
मूळ गाव | जम्मू काश्मीर |
धर्म | हिंदू |
पुरस्कार | रोलेक्स ॲवाॅर्ड फॉर इंटरप्राइज २०१६’,रॅमन मॅगेसेसे 2018, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२० |
यांना लडाखच्या शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक समजले जाते. सौर उर्जेवर चालणाऱ्या एसईसीएमओएल कॅम्पसची रचना करण्यासाठी ते ओळखले जातात. ते स्वयंपाकासाठी, प्रकाशासाठी किंवा उष्मेसाठी कोणतेही जीवाश्म इंधन वापरत नाहीत. वांगचुक यांना २०१६चा रोलेक्स ॲवाॅर्ड फॉर इंटरप्राइज लॉस एंजेलस येथे देण्यात आला प्रदान करण्यात आला. जागतिक स्तरावर प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार यापूर्वी फक्त १४० व्यक्तींना मिळाला आहे. १९९४ मध्ये ऑपरेशन न्यू होपच्या सुरुवातीस वांगचूक यांनी शासकीय व ग्रामीण समुदायांचा सहयोग घडवून आणला. त्यानी बर्फ स्टुपा तंत्रज्ञानाचा शोध लावला. ते कृत्रिम ग्लेशियर्स तयार करते. त्यामध्ये शंकूच्या आकाराची बर्फाची बांधणी हिवाळ्यात पाणी साठवण्यासाठी वापरली जाते.
बालपण
संपादनवांगचूक यांचा जन्म जम्मू आणि काश्मीरच्या लेह जिल्ह्यातील अळीटोजवळील उलेतोकोपो येथे झाला. त्यांचे वडील राज्यसभेचे सदस्य व मंत्री होते. गावात कुठलीही शाळा नसल्याने त्यांचे शिक्षण ९व्या वर्षापर्यंत झाले नाही. त्यांच्या आईने या कालावधीत त्यांना मातृभाषेचे प्राथमिक शिक्षण दिले.
१९७७ साली वांगचूक दिल्लीला पळून गेले व त्यांनी विशेष केंद्रीय विद्यालयात दाखल झाले.
संघटना
संपादनएज्युकेशनल अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL)
संपादनजे शिक्षणात गतिशील असून त्यांना परिस्थितीअभावी पुढील शिक्षण घेणे शक्य होत नाही, किवा गरीब परिस्थितीमुळे अपेक्षित क्षेत्रात जाणे शक्य होत नाही, अशा मुलांसाठी वांगचूक काम करतात. त्यासाठी त्यांनी १९८८ साली एका संस्थेची स्थापना त्यांनी केली. अशा मुलांना शिक्षणासाठी मदत करून त्यांची स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचे काम वांगचूक करत आहेत. शिक्षण तसेच पर्यावरण क्षेत्रात ते काम करत आहेत. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी या कामाला पूर्णपणे वाहून घेतले आहे. त्यांनी यासाठी एज्युकेशनल अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL) या नावाची संघटना तयार केली आहे.
येथे राहून त्यांनी अनेक स्थानिक भाषा आत्मसात केल्या. जेव्हा त्यांनी लडाख येथे शिक्षणविषयक कार्य सुरू केले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मुलांना प्रश्नांची उत्तरे माहिती असतात मात्र त्यांचा सर्वात मोठा अडसर म्हणजे भाषा आहे. त्यानंतर त्यांनी स्थानिक भाषेत तेथील मुलांना शिकवायला सुरुवात केली. जम्मू-कश्मीर सरकार बरोबर त्यांनी लडाखच्या शाळांतील अभ्यासक्रम स्थानिक भाषेत तयार करण्याचे कार्य हाती घेतले. १९९४ मध्ये त्यांनी शाळेतून काढून टाकण्यात आलेल्या १००० तरुणांची संघटना तयार केली आणि त्यांच्या मदतीने एक अशी शाळा काढली जी विद्यार्थामार्फतच चालवली जाते.
या शाळेत पूर्णपणे सौर उर्जेचा वापर केला जातो. वांगचूक यांना वाटते की शालेय अभ्यासक्रम बदलणे आवश्यक आहे. त्यांचे म्हणणे आहे की, पुस्तकी अभ्यासक्रमापेक्षा प्रात्यक्षिकांचा अवलंब जास्त हिताचा आहे. या सर्व बाबी प्रत्यक्षात आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
संदर्भ व नोंदी
संपादन- http://mr.beingmarathi.in/inspirational/ak13/ Archived 2017-11-13 at the Wayback Machine.