सेवादासनगर (मानोरा) हे महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील हे बंजाराबहुल गाव आहे. येथील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. येथील काही व्यक्ती महाराष्ट्र मंत्रालयात उच्चस्थ पदांवर पोचले आहेत. बंजारा साहित्य व संस्कृती क्षेत्रात विशेष योगदान असणारे साहित्यिक येथील रहिवासी आहे. शिवाय शासकीय-निमशासकीय स्तरावरील विविध पदांवर कार्यरत आहे.

  ?सेवादासनगर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मानोरा
जिल्हा वाशिम जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

वैशिष्ट्ये व पूर्वेतिहास

संपादन

बंजारा संस्कृतीनुसार बंजारा बहुल गावास 'तांडा' म्हणून संबोधले जाते. त्यामुळे या गावास सेवादासनगर तांडा किंवा वरोली तांडा असेही संबोधले जाते. ही वसाहत अरुणावती नदीच्या काठावर वसलेली असून सन २०११ च्या जनगणनेनुसार १२९९ लोकांची वसाहत आहे. बंजारा लोकवसाहतीचा अर्थात तांडयाचा उल्लेख पूर्वी त्या तांडयातील प्रमुख नाईकांच्या आणि ज्यांच्या पूर्वजांनी तांडा वसवीला त्या नाईकांच्या नावावरून ओळखला जात असे. त्यामुळे पूर्वी सेवादासनगर (वरोली तांडा) यांचा उल्लेख रामजी नायकेरो - हेमा नायकेरो तांडो (रामजी नाईकांचा तांडा) असे उल्लेख होत असे. रामजी रामसिंग नाईक हे आसपासच्या बारा मुलुखातील प्रचलित 'नाईक' होते. त्यांच्या पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ न्यायदानाचा सन्मान म्हणून कारंजा लाड येथील रामकिसन मारवाडी यांनी त्यांना पाच एकर जमीन बक्षिस रुपात दिली होती.[] महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी स्थापन केलेल्या बंजारा समाजाची मातृ संघटना म्हणून ऑल इंडिया बंंजारा सेवा संघाचा उल्लेख होतो. या ऐतिहासिक मातृ संघटनेच्या स्थापनेत रामजी नाईक यांचा सुद्धा सहभाग होता. रामजी रामसिंग नाईक बरोबरच या तांडा अंतर्गत हेमा नाईक व बालू नाईक यांचाही उल्लेख होतो. एक भाषा, एक संस्कृती असे या तांडयाचे वैशिष्ट्ये आहे. या तांड्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे. तसेच भूमीहीन आदिवासी व बंजारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव नाईक यांनी नवाटी या ऐतिहासिक योजनांचे भूमिपूजन केले. त्यांच्या कल्पनेतून स्थापन केलेल्या तत्कालीन अकोला जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायटी या सर्वात मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदावर रामजी रामसिंग नाईक होते. याशिवाय या तांडयात संत मुंगसाजी महाराज, संत गाठोडे बाबा ,धर्मगुरू संत रामराव महाराज, संत नथ्थूसिंग महाराज डोल्हारीदेवी , व्यसनमुक्ती सम्राट प.पु.खोडे महाराज, बंजारा नायक हरिभाऊ राठोड, इ. येऊन गेलेले आहेत.

सेवादास नगर हे बंजारा तांडा असून वरोली या प्रस्थापित गावापासून त्याला स्वतंत्र करण्यात आले. स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी तत्कालीन समाजसेवी रामजी रामसिंग नाईक यांचे सुपुत्र नारायणराव नाईक यांनी पुढाकार घेतलेला होता. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून या तांडयाचा सेवादास नगर असा उल्लेख होतो. स्वतंत्र ग्रामपंचायत सेवादास नगरचे पहिले सरपंच म्हणून देविसिंग राठोड (खेतावत) यांची निवड करण्यात आली.

भौगोलिक स्थान

संपादन

सेवादास नगर हे गाव अरुणावती नदीच्या काठावर वसलेले असून मानोरा तालुक्याच्या पुर्वेस तर दिग्रस तालुक्याच्या उत्तरेस येते. दारव्हा तालुक्यापासून दक्षिणेस आहे‌. यवतमाळवाशिम जिल्ह्याच्या मध्यसिमेवर आहे. सेवादास नगर या गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ १११४.१५ हेक्टर आहे.

हवामान

संपादन

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

लोकजीवन

संपादन

बंजारा भाषिक तांडा असून येथे बंजारा ही मातृभाषा प्रामुख्याने बोलली जाते. बंजारा संस्कृतीप्रमाणे विविध सण उत्सव साजरे केले जातात. संत सेवालाल महाराज, सामकी माता, वसंतराव नाईक जयंती, लखीशाह बंजारा जयंती उत्सव साजरे केले जातात. शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

येथून उत्तरेकडे कुराड रोडवर अंदाजे तीन कि.मी.अंतरावर 'फत्तेपूरी महाराज टेकडी' प्रसिद्ध आहे. या टेकडीवर फत्तेहसिंह पुरी या वैराग्य मूर्ती साधूंची फार पुरातन समाधी आहे. येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी जमतात. येथून जवळच पुर्वेकडे रामजी रामसिंग नाईक यांची समाधी आहे.

तसेच येथून जवळच बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवीउमरीगड आहे तसेच गहुलीगड हे प्रेरणास्थळ आहे.

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

पश्चिमेस मानोरा हे तालुक्याचे ठिकाण असून या मार्गावर जवळच कार्ली हे गाव आहे. तर जवळच दक्षिणेला वरोली गाव आहे.पुर्वेस हरसुल,मोरखेड आणि उत्तरेस कुराड हे गाव आहे.

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  1. ^ प्रा. जाधव, जयसिंगराव (2018). भूमिपुत्राचं देणं : वसंंतराव नाईक. उस्मानाबाद: लोकनेता पब्लिकेशन. ISBN 978-93-5321-266-7.