सेर्जियो मात्तारेल्ला
सेर्जियो मात्तारेल्ला (इटालियन: Sergio Mattarella ; जन्मः २३ जुलै १९४१) हा इटली देशामधील एक राजकारणी व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. १९८३ ते २००८ दरम्यान इटालियन संसदेचा सदस्य राहिलेला मात्तारेल्ला १९८९-९० दरम्यान इटलीचा शिक्षणमंत्री तर १९९९-२००१ दरम्यान संरक्षणमंत्री होता.
सेर्जियो मात्तारेल्ला | |
इटलीचा १२वा राष्ट्राध्यक्ष
| |
विद्यमान | |
पदग्रहण ३ फेब्रुवारी २०१५ | |
पंतप्रधान | मात्तेओ रेंत्सी |
---|---|
मागील | ज्योर्जियो नापोलितानो |
जन्म | २३ जुलै, १९४१ पालेर्मो, इटली |
गुरुकुल | पालेर्मो विद्यापीठ |
धर्म | रोमन कॅथलिक |
८ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेल्या ज्योर्जियो नापोलितानोने १४ जानेवारी २०१५ रोजी राजीनामा दिल्यानंतर ३१ जानेवारी २०१५ रोजी संसदेने मात्तारेल्लाची राष्ट्राध्यक्षपदी निवड केली.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत