सुप

ईजपीठ
(सूप या पानावरून पुनर्निर्देशित)

सुप या साधनाने सर्व प्रकारचे धान्य, गहू बाजरी इत्यादी पाखडले जाते. काडीकचरा धान्यातून वेगळा काढण्याच्या प्रक्रियेला पाखडणे असे म्हणतात.पाखडणे ही धान्य निवडण्याची आधीची पायरी आहे. पाखडलेल्या धान्यास निवडण्यास जास्त त्रास होत नाही.

सुप एक प्रकारच्या गवतापासून तसेच बांबूच्या चोयट्यांपासूनही बनवले जाते. यासाठी बांबूचे चोयटे एका आड एक असे विणले जातात. या साधनाची एक बाजू उंच असते तर दुसऱ्या बाजून कचरा उडून जाण्यासाठी मार्ग राखलेला असतो.पूर्वीचे लोक याला गायीचे शेणाने सारवत असत. शेणाने सारवल्याने धान्य छोटया-छोट्या छिद्रांंतून खाली सांडत नाही. यास कोणी कपड्याची राख जवसाच्या तेलात मिसळवून ती पेंटसारखी लावतात अथवा थेट पेंटदेखील लावतात. याप्रक्रियेला किटवणे असे म्हणतात

सुपाने पाखडण्याचे कामात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तसेच थोडाबहुत हवेचा वापर करण्यात येतो. त्याद्वारे पाखडण्यासाठीच्या धान्यातील कचरा किंवा धान्याचे दाणे वेगवेगळे करता येतात.

यातून निघालेल्या कचरामिश्रीत धान्यास 'पाखडा' असे म्हणतात.


[ चित्र हवे ]